आमेर हाशमी व सय्यद इमरान यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मानचिन्ह सहीत समाज भुषण पुरस्कार
उदगीर (एल.पी. उगिले) : महात्मा बसवेश्वर महाविद्यालय लातूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी (प्रोटान) विंग चे दुसरे मराठवाडा विभागीय अधिवेशनात उदगीर शहरात सतत गेल्या पाच वर्षापासून समाज सेवेत अग्रेसर असणारे बहुजन कल्याणासाठी आणि उत्थानासाठी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून सहारा मित्र मंडळ चे कार्याध्यक्ष आमेर हाशमी व जिल्हा अध्यक्ष सय्यद इमरान यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मानचिन्ह सहीत समाज भुषण पुरस्कार देण्यात आले. या वेळी उपस्थित अनेक नामांकित मान्यवर मंडळी होते.