लहान बालकांसाठी बुधवारी मोफत सुवर्णप्राशन शिबिर

लहान बालकांसाठी बुधवारी मोफत सुवर्णप्राशन शिबिर

उदगीर(प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत हैदराबाद(मराठवाडा)मुक्ती संग्राम दिन-सप्ताह निमित्ताने हमारा आयुष-हमारा स्वास्थ्य आणि आयुर्वेदा फॉर न्यूट्रिशन या संकल्पनेनुसार जन्मापासून ते 16 वर्ष वयोगटाच्या लहान बालकांसाठी मोफत सुवर्णप्राशन(बाल रसायन घृतपान)-एक आयुर्वेदिक लसीकरण हे शिबिर पुष्य नक्षत्र दिवस बुधवार,दिनांक:-21-09-2022 रोजी सकाळी ठीक 10.30am ते दुपारी 04.30pm या वेळेत धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,श्रीकृष्ण मंदिरासमोर,देगलूर रोड,उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे.

सुवर्णप्राशन केल्यामुळे लहान बालकांच्या शरीरात इम्युन सेल्स व टी-सेल्स वाढतात,रोगप्रतिकारक्षमता वाढते,शरीरामध्ये कसलेही मेटाबाॅलिक बदल न होता शारीरिक-मानसिक बौद्धिक विकास होतो आणि त्वचेची कांती वाढते असे सेंटर फॉर बायोमेडिकल रिसर्चच्या वैज्ञानिकांनी संशोधन केले आहे.

तरी पालकांनी त्यांच्या लहान बालकांना या मोफत सुवर्णप्राशन शिबीराचा लाभ मिळवून द्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे अध्यक्ष रो.रामेश्वर निटुरे,प्राचार्य तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ.दत्तात्रय वि.पाटील,सचिव रो.व्यंकट कणसे,प्रोजेक्ट चेअरमन रो.महानंदा सोनटक्के,ह्यूमन डेव्हलपमेंट डायरेक्टर रो.डॉ.एस.आर.श्रीगिरे,रुग्णालय समिती प्रमुख प्रा.डॉ.मंगेश मुंढे,N.A.B.H.समिती प्रमुख प्रा.डॉ.राजेंद्र धाटे,रुग्णालय समिती सहप्रमुख प्रा.डॉ.रविकांत पाटील,N.A.B.H.समिती सहप्रमुख प्रा.डॉ.रश्मी चिद्रे,बालरोग विभागप्रमुख प्रा.डाॅ.अस्मिता भद्रे,रुग्णालय उपाधिक्षक डॉ.उषा काळे,सुवर्णप्राशन शिबीर समन्वयक प्रा.डॉ.शिवकुमार होटुळकर आणि रोटरी क्लबचे पदाधिकारी-सदस्य व धन्वंतरी आयुर्वेद कॉलेजचे डॉक्टर्स-रुग्णालयीन कर्मचारी यांनी केले आहे.

About The Author