ग्रामपंचायतीच्या मार्फत दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेला 5% निधी दिव्यांगाच्या कल्याणाकरिता तात्काळ खर्च करण्यात यावा – प्रहारची मागणी

ग्रामपंचायतीच्या मार्फत दिव्यांगासाठी राखीव ठेवण्यात आलेला 5% निधी दिव्यांगाच्या कल्याणाकरिता तात्काळ खर्च करण्यात यावा - प्रहारची मागणी

उदगीर (एल.पी. उगीले) : दिव्यांग व्यक्ती ( समान संधी हक्काचे संरक्षण व संपूर्ण सहभाग ) अधिनियम 2019, 95 मधील कलम 40 अन्वये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांग कल्याण साठी पाच टक्के निधी राखून ठेवणे बाबत निर्देश दिलेले आहेत . सद्यस्थितीत केंद्र शासनाने दिव्यांग हक्क अधिनियम 2016 हा कायदा देशभर लागू केलेला आहे . सदर कायद्याची अंमलबजावणी दिनांक 19/ 4 /2017 पासून देशातील सर्व राज्यभरात करण्यात येत आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 37 नुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांचा 5% निधी दिव्यांगाच्याच कल्याणासाठी राखून ठेवून विविध योजनांमध्ये दिव्यांगासाठी पाच टक्के आरक्षण ठेवणे बाबत निर्देश दिलेले आहेत. या अनुषंगाने नगरविकास विभागाचे दिनांक 19 मे 2018 च्या शासन निर्णयानुसार व ग्रामविकास विभागाने दिनांक 25 जून 2018 च्या शासन निर्णयानुसार त्यांच्या अधिनिस्त स्थानिक स्वराज्य संस्थांना 5% निधी दिव्यांग कल्याणार्थ राखून ठेवून खर्च करणे बाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. असे असताना आपल्या कार्यक्षेत्रातील बहुतांश ग्रामपंचायत यांनी पाच टक्के निधी हा वापरलेला दिसून येत नाही . तसेच दिव्यांगासाठी विशेष लेखाशीर्ष उघडलेला एकाही ग्रामपंचायत मध्ये आढळून आलेला नाही.

मागील पाच वर्षात पाच टक्के निधी खर्चाच्या अहवालानुसार राखीव निधी संपूर्ण खर्च न करता तरतूद अखर्चित ठेवल्याचे दिसून येत आहे. ,Lह्या प्रश्नाने आपण तातडीने लक्ष घालून तालुक्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवू नये, व ग्रामपंचायतच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत व मार्गदर्शन कसे देता येईल? यावर भर घालून शासनाच्या सर्व मुख्य योजनांमध्ये दिव्यांगांना अग्रक्रमाने कसे घेता येईल? याबाबत तजवीज करावी.

अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष या प्रश्णावर दिव्यांगाच्या नेतृत्वात आंदोलन उभे करेल . असे निवेदन गट विकास अधिकारी यांना देण्यात आले. या वेळी प्रहार महिला आघाडी च्या जिल्हाप्रमुख काचंन भोसगे , उपजिल्हाप्रमुख प्रेमलता भंडे, तालुकाध्यक्ष विजयमाला पवार, उपजिल्हाप्रमुख विनोदभाऊ तेलंगे , उदगीर तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे ,तालूका कार्याध्यक्ष महादेव आपटे ,तालुका सचिव अविनाश शिंदे ,तालुका उपाध्यक्ष महादेव मोतीपोवळे , तालुका संघटक सोपान राजे ,व ईतर प्रहार सेवक उपस्थित होते.

About The Author