ज्ञानेश्वर जवळे यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान

ज्ञानेश्वर जवळे यांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मान

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील निडेबन येथील रहिवासी आणि सरस्वती विद्यालय कुमठा (बु) येथील मराठी विषयाचे अध्यापक ज्ञानेश्वर रामराव जवळे यांना त्यांच्या 16 वर्षीच्या अखंड शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन संघ (प्रोट्रोन) महाराष्ट्राचा राष्ट्रीय स्तरावरील छत्रपती शाहू महाराज न्यायप्रिय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार त्यांना स्वा. रा. तीर्थ म.विद्यापीठाचे उपकुलसचिव प्रा. डॉ. रवि सरोदे यांच्या हस्ते देण्यात आला. या त्यांच्या गौरवा बद्दल संस्था अध्यक्ष डॉ. अशोकराव सांगवीकर,सचिव डी. बी.लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक जी .आर. शिंदे,एम.बी वाघमारे,जे व्ही माने,व्ही.जी पुठेवाड, यु .आर कांबळे प्रा.बी.एस पटवारी, संतोष मुंढे, यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षेकत्तर कर्मचारी, विद्यार्थी अभिनंदन केले आहे.

About The Author