समूह शेतीकडे शेतकरी बांधवांनी वळावे – तहसीलदार प्रसाद कुलकर्णी
अहमदपूर (गोविंद काळे) : गावातील शेतकरी बांधवांनी आपल्या भागातील वाद तंटे सोडून समूह शेतीकडे वळावे आणि आपल्या शेतातील धान्याचे उत्पन्न वाढवून आपली आर्थिक उन्नती करावे असे प्रतिपादन अहमदपूर शेतकरी उत्पादक कंपनीच्या भव्य शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचा शुभारंभ तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आला तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी तवर साहेब , प्रमुख पाहुणे समीर पाटील (असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट सीएससी एस पि व्ही महाराष्ट्र), मुकेश शर्मा (ॲग्रीकल्चर हेड सीएससी एस पि व्ही महाराष्ट्र) , गणेश कान्हेरे (कॅन्सलटन्ट ॲग्रीकल्चर सीएससी एस पि व्ही महाराष्ट्र) आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे तहसीलदार कुलकर्णी साहेब म्हणाले की शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीतील वाद – तंटे यामध्ये आपले जीवन घालू नये तसेच न्यायालयीन वादात न पडता आपापसात चर्चा करून तंटे सोडवावेत आणि समूह शेती करून आधुनिक व सेंद्रिय शेती करण्याकडे जास्त लक्ष द्यावे आणि आपली आर्थिक उत्पादनातून कौटुंबिक उन्नती करावी . शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी अहमदपूर शेतकरी उत्पादक कंपनी लि. ला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
गणेश कान्हेरे यांनी या कंपनीमार्फत शेतकऱ्यांच्या मातीतील उत्पन्न केलेल्या मालाला तसेच त्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रक्रियाची माहिती यावेळी उपस्थित असलेल्या शेतकरी बांधवांना व्यासपीठावरून दिली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व शासनाच्या विविध योजना या सीएससी एस पि व्ही यांच्या माध्यमातून दिल्या जातात त्याचा तुम्ही परिपूर्ण उपभोग करून घ्यावा आणि विकेल अशाच पिकांचे उत्पादन घेण्यावर भर द्यावा असे या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व अल्प दरात बांधावर शेतीशी निगडित खते, बी- बियाणे, कीटकनाशके व अवजारे इ. देण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला जाईल असे यावेळी मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला विळेगाव, मावलगाव, व्होटाळा, सुमठाणा, सलगरा, अहमदपूर, किनी, हाडोळती, तिर्थ धानोरा, सावरगाव थोट, वळसंगी तसेच अनेक गावातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती याप्रसंगी आधुनिक यंत्र – तंत्र वाहनांचे प्रदर्शन तहसीलदार प्रसादजी कुलकर्णी व समीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बालाजी पवार (प्रोजेक्ट हेड सीएससी आर डी डी ),अमित चापले (डिस्ट्रिक्ट मॅनेजर सीएससी आर डी डी), राहुल राऊत (डिस्ट्रिक्ट को- ऑर्डीनेटर सीएससी),विकाल भद्रे(डिस्ट्रिक्ट मॅनेजर सीएससी) यांची उपस्थिती होती तर विवेकानंद कोनाले, कपिलेश्वर ढोले,तुकाराम सुरनर, चैतन्य चिलकेवार,महेश लव्हराळे, सचिन कोरनुळे, सिद्धेश्वर येने, गणेश हाके, चंद्रशेखर कोरनुळे, योगेश पांचाळ, संतोष उटगे व सादिक शेख आदी अहमदपूर शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक मंडळाची विशेष उपस्थिती होती तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी विशाल करंजे , जब्बार शेख, ज्ञानेश्वर सूर्यवंशी संगणक परिचालक संघटना जिल्हा अध्यक्ष , सोहेल शेख ,असद शेख,विवेक चिलकेवार आदीने खूप परिश्रम घेतले. शुभारंभ कार्यक्रमाचे प्रस्ताविक कंपनी डायरेक्टर कपिलेश्वर ढोले यांनी मांडले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक परमेश्वर वाकडे सर यांनी केले व आभार सादिक शेख यांनी मांडले.