शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 25 हजार रु.अनुदान द्या कृषी मंत्र्यांकडे माजी मंत्री विनायकराव पाटील यांची मागणी

शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 25 हजार रु.अनुदान द्या कृषी मंत्र्यांकडे माजी मंत्री विनायकराव पाटील यांची मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर व चाकुर तालुक्यातील सोयाबीन व इतर खरीप पिकांचे गोगलगाईच्या प्रादुर्भावामुळे व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही शासनाकडून नुकसान भरपाई प्राप्त होऊ शकली नाही. संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजी केल्याने अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकरी अनुदाना पासून वंचित राहीला असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कडे केली आहे.

अहमदपूर व चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाला नुकसानीचा अहवाल दिला नाही. त्यामुळे शेतकरी अनुदाना पासून वंचित राहीले आहेत. तरी अहमदपुर व चाकुर तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान देण्या संदर्भात लेखी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कडे प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आहे.यावेळी भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार सुधाकर भालेराव उपस्थित होते. सदरील निवेदनाची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांना देण्यात आले.

About The Author