माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना राज्यस्तरीय सहकार नेतृत्व पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छांचा वर्षाव
विविध संस्था पदाधिकारी कार्यकर्ते यांची आशियाना निवासस्थानी सत्कारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी
लातूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे माजी मंत्री सहकार महर्षी तथा देशातील सहकार साखर कारखानदारीत अव्वल स्थानावर असणाऱ्या लातूर च्या मांजरा साखर परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांना नुकताच संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय मानाचा सहकारातील नेतृत्व पुरस्कार जाहीर झाला. तो पुरस्कार २३ सप्टेंबर २०२२ रोजी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत व अन्य मान्यवरांच्या हस्ते शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोमवारी १९ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध संस्था पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, संस्थाचालक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला आशियाना निवासस्थानी शुभेच्छा चा वर्षाव करण्यात आला दरम्यान आशियाना निवासस्थान कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या उपस्थितीने हाऊस फुल्ल झालेले दिसत होते काही काळ सरस्वती कॉलनी परिसरात वाहतूक जाम झालेली होती.
माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी मागच्या ४५ वर्षात राज्याचे दोन वेळा मंत्री पद, लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन, मांजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे चेअरमन, संचालक, समाजकारण, राजकारण, सहकार, कृषी, शिक्षण , शैक्षणीक संस्था, साखर कारखानदारी, बाजार समिती, राज्य सहकारी बँक, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पूणे, विविध धार्मिक संस्थेत संचालक, मार्गदर्शक अशा विविध क्षेत्रांत कार्य करताना आजतागायत आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचा विचार करणारे निर्णय घेण्याची क्षमता असणारे कार्यक्षम नेतृत्व, दूरदृष्टी, इच्छाशक्ती, लोकांना सतत मदत करण्याची भूमिका, कामात शिस्तप्रियता, पारदर्शकता या बळावर दिलीपराव देशमुख साहेब यांनी मागच्या ४० वर्षाच्या कार्यकाळात माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन राज्यात सहकार क्षेत्रात लातूरचा दबदबा निर्माण केला आहे वेगवेगळ्या संस्थेत काम करत असताना साहेब यांनी संस्थांत पारदर्शकता ठेवून अचूक कामगिरी करत सहकार चळवळ टिकवून ठेवली आहे यात कुठलेही राजकारण न करता जे योग्य आहे त्यांना मदत केली आहे हे सूत्र त्यांनी पाळले आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन संगमनेर येथील स्वातंत्र्यसैनिक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरित क्रांती चे प्रणेते डॉ आण्णासाहेब शिंदे जयंती महोत्सव प्रेरणा दिनी हा राज्यस्तरीय सहकार नेतृत्व पुरस्कार २३ सप्टेंबर रोजी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांना दिला जाणार आहे.
आशियाना निवासस्थानी माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते संस्थाचालक कार्यकर्ते यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार वैजनाथ जी शिंदे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजूळगे, उपाध्यक्ष शाम भोसले, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, जयेश माने, एन आर पाटील, राजकुमार पाटील, अनुप शेळके, मांजरा साखर कारखान्याचे संचालक धनराज दाताळ, शंकर बोळंगे अशोक काळे, गोविंद डूरे, संभाजी सूळ, शिवाजी कांबळे, महेंद्र भादेकर, हरिराम कुलकर्णी, राजकुमार शिंदे पाटील, मनोज पाटील सचिन दाताळ, बालाजी साळुंखे, विजय कदम, बंडू पाटील, बप्पा मार्डीकर, अल्ताफ शेख, अँड देविदास बोरुले, गरड, पाटिल, जगदीश बावणे, ज्ञानेश्वर भिसे, अमोल भिसे, लक्ष्मण मोरे, जिल्हा परीषद सदस्य धनंजय देशमुख, सतीश पाटील, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष विजयकुमार पाटील उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे, उदयसिंह देशमुख, संचालक वारद, श्रीकृष्ण काळे, मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रनवरे, विविध खाते प्रमूख अधिकारी, जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, रोटरी क्लब, गणेश मंडळ उत्सव अध्यक्ष, डॉक्टर मंडळी जेष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.