परळी ते चादापूर डोंगरतुकाई रोडची दुरावस्था; त्वरित रोड करावा – अँड.मनोज संकाये यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी!
परळी वैजनाथ (गोविंद काळे) : परळी शहरातून देवी डोंगरतुकाई मंदिराकडे जाणारा चांदापूर मार्गे असणारा रस्ता अतिशय दुरावस्थेमध्ये आहे. या रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करावे अशी मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अँड.मनोज संकाये यांनी केली आहे. देवीचा नवरात्र उत्सव काही दिवसा नंतर सुरू होणार आहे त्यासाठी परळी तालुक्यातील आणि शहरातील व इतर परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येत असतात त्यांना वाहतुकीसाठी रस्त्याची सोय नाही त्यामुळे रस्ता नवरात्र उत्सवापूर्वी होणे गरजेचे आहे.
नवरात्र उत्सव परळी शहरांमध्ये आणि परिसरामध्ये मोठ्या थाटात आणि भक्ती पूर्ण वातावरणात साजरा होत असतो कालरात्री देवी मंदिरापासूनचा पालखी मार्ग हा देखील खराब झाला आहे त्या मार्गाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. नऊ दिवस हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो त्यामुळे बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी वर्गाने या गोष्टीकडे गांभीर्याने पाहून त्वरित डोंगरतुकाईचा रस्ता आणि पालखी मार्ग दुरुस्त करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.