यशवंत विद्यालयाच्या दोन शिक्षकांना रोटरीचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्रधान

यशवंत विद्यालयाच्या दोन शिक्षकांना रोटरीचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार प्रधान

अहमदपूर (गोविंद काळे) : यशवंत प्राथमिक विद्यालयाचे उपक्रमशील मुख्याध्यापक राजेश्वर पारशेटे, आणि यशवंत विद्यालयाचे सहशिक्षक मनोहर ढेले यांना सन 2022 चा रोटरी च्या वतीने दिला जाणारा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार मराठवाडा शिक्षक संघाचे आ. विक्रम काळे यांच्या हस्ते व गटशिक्षणाधिकारी बबनराव ढोकाडे यांच्या उपस्थितीत प्रधान करण्यात आला.

या निवडीबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक सांगवीकर, सचिव शिक्षण महर्षी डी बी लोहारे गुरुजी, मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले, उप मुख्याध्यापक रमाकांत कोंडलवाडे, पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, दिलीप गुळवे, रामलिंग तत्तापूरे, रोटरीचे सचिव के.डी. बिराजदार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

About The Author

error: Content is protected !!