निलंगा तालुका जि. प. शिक्षक पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न
निलंगा (प्रतिनिधी) : राधाकृष्ण मंगल कार्यालय निलंगा येथे चेअरमन अरुण सोळुंके यांच्या नेतृत्वात संपन्न झाली. सर्वसाधारण सभेच्या प्रथम सत्रात अध्यक्ष म्हणून खरटमोल एम बी सर हे होते. उद्घाटक गिरी डी बी साहेब,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि प लातूर प्रमुख पाहुणे गडेकर साहेब,सहाय्यक निबंध निलंगा व शिंदे सहाय्यक निबंधक लातूर तसेच प्रमुख व्यक्ती म्हणून सहकार प्रक्षिक्षण केंद्राचे प्राचार्य ठोंबरे बी बी साहेब हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तावित पतसंस्थेचा चेअरमन श्री.अरुण सोळुंके सर यांनी केले ,त्यावेळी चेअरमन अरुण सोळुंके यांनी पतसंस्थेचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला सर्वासमोर मांडला तोट्यातील पतसंस्था नफ्यामध्ये आणून गेल्या चार वर्षापासून चढत्या क्रमाने लाभांश वाटप करीत आहे. गेल्यावर्षी 1% व्याजदर कमी करून व 11 महिन्याच्या पगार जमावर (माहे फेब्रुवारी 2022 चा पगार एप्रिल मध्ये झाला.) यावर्षी या पतसंस्थेचा पन्नास लाख पस्तीस हजार शंभर रु. (50,35,100₹)झाला असून सभासद बांधवाला सात टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले पतसंस्था कर्जमर्यादा पंधरा लाख ₹ केली तातडी कर्ज 50000 ₹ व दिपवाळी फेस्टिवल लोन 20000 ₹ करण्यात आले तसेच कर्जावरील व्याजदर नवीन वर्षापासून एक टक्का कमी करून 11 टक्के व्याज दराने कर्ज देणार असे अरुण सोळुंके यांनी जाहीर केले पतसंस्थेमध्ये दोन कोटी बारा लाख रूपये ठेवी दर महिन्याला तीन लाख रुपये आवर्त ठेव तसेच दर महिन्याला तीन लाख रुपये भाग भांडवल जमा होत असून पतसंस्थेच्या उन्नतीसाठी ठेवी व आवर्त ठेवी सर्व सभासदांनी ठेवाव्या सभासदाला हे आवाहन केले गेल्या 45 वर्षातला यावर्षीचा नफा सर्वात मोठा नफा असून पतसंस्था उन्नतीकडे मार्गक्रमण करत आहे असे सांगितले मुख्य कार्यकारी अधिकारी गिरी यांनी सुद्धा या पतसंस्थेचा सभासद असून दर महिन्याला मी आवर्त ठेव पाच हजार ₹ रुपयाची काढलेली आहे व पतसंस्थेचा चढता आलेख पाहून आनंद वाटतो .अशी सभेला सांगितले श्री ठोंबरे बी.बी.यांनी पतसंस्थेचे बदललेली नियम करावयाची कामे संचालक मंडळाचे कर्तव्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले पतसंस्थेचे सचिव गंभीरे केशव यांनी तोट्यातील पतसंस्था नफ्यात आणण्यासाठी केलेली प्रयत्न पतसंस्थेचा कोणताही संचालक बैठक भत्ता घेत नाही तसेच केलेली काटकसर याबाबत सभेला संबोधित केले.सभेत गुणवंत सभासद पाल्याचा सत्कार सेवानिवृत्ती शिक्षकांचा सत्कार तसेच आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला या सर्वसाधारण सभेत संचालक संजय कदम ,लखणे धर्मप्रकाश ,व्हा चेअरमन दयानंद मठपती ,चंद्रकांत पाटील, संजय चव्हाण , गुंडुरे डी बी ,संजय अंबुलगेकर, सराटे पी जी ,धुमाळ डी एस सचिव केशव गंभीरे ,सुनिता रोळे ,दिपाली माने उपस्थित होते सभेचे आभार संजय कदम यांनी मांडले सभेचे सूत्रसंचालन व्हाईस चेअरमन दयानंद मठपती यांनी केले सर्वसाधारण सभा आनंदात संपन्न झाली.