मुली-महिलांची आरोग्य तपासणी तथा मोफत रोगनिदान-रक्त/लघवी तपासणी व औषधोपचार शिबीर

उदगीर (एल.पी.उगीले) : रोटरी क्लब उदगीर सेंट्रल आणि धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग,लातुर यांच्या सहकार्याने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मराठवाडा(हैद्राबाद)मुक्ती संग्राम दिन-पंधरवाडा तसेच नवरात्र महोत्सव निमित्ताने आरोग्य सर्वांसाठी,हमारा आयुष-हमारा स्वास्थ्य,आयुर्वेदा फॉर न्यूट्रिशन आणि हर घर-हर दिन आयुर्वेद या संकल्पनेनुसार दिनांक 28 ते 30 सप्टेंबर 2022 यादरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 04.30 या वेळेत श्री राजराजेश्वरी मंदिर देवस्थान,मल्लापुर,उदगीर येथे मुली,महिलांची आरोग्य तपासणी तथा सर्व रोगनिदान,रक्त/लघवी तपासणी व आवश्यकतेनुसार औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

आमवात,संधिवात,पक्षाघात(लकवा पॅरालिसीस),मणक्याचे विकार, आम्लपित्त, मधुमेह, मुळव्याध, त्वचाविकार, लठ्ठपणा,मोतीबिंदू, नेत्ररोग, दंतरोग, श्‍वसनाचे विकार, पोटाचे विकार, लहान बालकांचे आजार, श्वेतप्रदर, रक्तप्रदर व मासिक पाळी समस्या इत्यादी आजारांच्या रुग्णांवर या शिबीरामध्ये मोफत औषधी,पंचकर्म उपचार करण्यात येणार आहे.रोगनिदान विभागाच्या वतीने रक्त व लघवी तपासणी नि:शुल्क करण्यात येणार आहे.

तरी या मोफत शिबीराचा मुली-महिलांनी लाभ घ्यावा. असे आवाहन रो.रामेश्वर निटुरे(अध्यक्ष,रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल),डॉ.दत्तात्रय पाटील(प्राचार्य,धन्वंतरी आयुर्वेद कॉलेज,उदगीर),रो व्यंकट कणसे(सचिव),रो.डॉ.सायाराम श्रीगिरे(ह्युमन डेव्हलपमेंट डायरेक्टर),
रो.डॉ.विजय कवठाळे(प्रोजेक्ट चेअरमन),रो.डॉ.विजय केंद्रे(प्रोजेक्ट चेअरमन),रो.डॉ.रश्मी चिद्रे(प्रोजेक्ट चेअरमन),डॉ.राजेंद्र धाटे(N.A.B.H.-कार्यकारी प्रमुख),डॉ.मंगेश मुंढे कार्यकारी प्रमुख-रुग्णालय समिती),डॉ.रविकांत पाटील(सहप्रमुख,रुग्णालय समिती),डॉ.उषा काळे(रुग्णालय उपाधिक्षक),डॉ.पुष्पा गवळे,डॉ.अमोल पटणे,डॉ.नामदेव बनसोडे,डॉ.अस्मिता भद्रे,डॉ.योगेश सुरनर,डॉ.स्नेहल पाटील,डॉ.दिपीका भद्रे,डॉ.नम्रता कोरे,डॉ.शिवकांता चेटलुरे,डॉ.शिवकुमार होटुळकर यांनी केले आहे.

About The Author