उदगीरात राधासाई दांडीया महोत्सव २०२२ चे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरामध्ये दुध डेअरी, दुधिया हनुमान मंदिर शेजारी याठिकाणी दि. ३० सप्टेंबर ते ०३ ऑक्टोबर दरम्यान राधासाई दांडीया महोत्सव व स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक अभिजित औटे व श्याम ठाकूर, बाळासाहेब पाटोदे, सतीश पाटील यांनी दिली. या स्पर्धा फक्त युवती व महिलांसाठी आयोजीत करण्यात आले असून तिकीट दर प्रत्येक स्पर्धकासाठी १०० रु. ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये फॅन्सी ड्रेस, युवती गट, महिला गट, महिला ग्रुप व बालगट असे विभाग असणार आहेत. या दांडीयासाठी दि. २८ व २९ सप्टेंबर रोजी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या स्पर्धा दि. ३० सप्टेंबर व ०१,०२, ०३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते १० यावेळेत होणार आहेत. या स्पर्धेमध्ये महिला गटास प्रथम पारितोषिक रु.३१००, द्वितीय रु.२००० व तृतीय रु. ११०० महिला (वैयक्तीक) पारितोषिक प्रथम रु. १५००, द्वितीय रु.१००० व तृतीय रु. ७५०, युवती गट प्रथम पारितोषिक रु. २१००, द्वितीय रु.१५०० व तृतीय रु.११००, युवती गट (वैयक्तिक) प्रथम पारितोषिक रु. १०००, द्वितीय रु. ७५० व तृतीय रु ५००, महिला ग्रुप (४ पेक्षा जास्त) प्रथम पारितोषिक रु ३१००, द्वितीय रु.२०००, व तृतीय रु. ११००, बालगट (वय ६ ते १२) प्रथम पारितोषिक रु.१०००, व्दितीय रु. ७५० व तृतीय रु. ५०० तसेच फॅन्सी ड्रेस (सिंगल) प्रथम, द्वितीय व तृतीय भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून सुनिल कोळी श्रध्दा कोळी व ललिता पंडिया हे काम पाहणार आहेत. या दांडीया महोत्सवाचे मुख्य मार्गदर्शक माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे व माजी आमदार सुधाकर भालेराव हे असून सल्लागारपदी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, तुकाराम पाटील, धनाजी मुळे, सुभाष नागठाणे, मीरा चंबूले, स्मिता येरोळकर, श्रद्धा जगताप, साईप्रकाश पारसेवार, मनोज पुदाले, उत्तरा कलबुर्गे, दीपाली औटे, मोहिनी अचोले, पल्लवी मुक्कावार, सुनिता मोरे, नीता मोरे, भाग्यश्री केंद्रे, ज्योती डोळे, ऐश्वर्या भालेराव, चारुशीला पाटील, सुरेखा गिरी, ज्योती स्वामी, नीलिमा पारसेवार, जयश्री हिंगणे, प्रीती मुक्कावार, डॉ. श्रद्धा वट्टमवार, रविंद्र हसरगुंडे, मोतीलाल डोईजोडे, कविता डोंगरगे, स्वाती गुरुडे,, अश्विनी मानकरी, अँड. पुजा कप्पीकेरे, डॉ. विश्वनाथ डांगे, डॉ. व्यंकटेश वट्टमवार, डॉ. सुनिल बनशेळकीकर, डॉ. महेश जाधव, डॉ. विक्रम माने, डॉ. संदीप सोनटक्के, राघवेंद्र देशमुख आदी जण आहेत. या दांडीया महोत्सवात युवती व महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन अँड.पुनम टाकळे, मधुमती कनशेट्टे, सरोजा वारकरे, शिवगंगा बिरादार, अंजुषा उगीले, मयुरी खंडाईत, पुनम मुळे, अश्विनी चामवाड, स्नेहा चणगे, मंदाकिनी जीवणे, अनिता बिरादार, शशिकला चव्हाण, उषा माने, मंजुषा कुलकर्णी, रेखा कानमंदे, सुप्रिया मठपती, अनुराधा घोड, अनिता श्रीनेवार, जया काबरा, सपना बजाज, शोभा आपटे, संगीता नेत्रगावे, सरोजा बिरादार, ललिता झिल्ले, विनोद पदमगीरवार, अभंग जाधव, विकास मोरे, सुधाकर पंदीलवार, शिल्पा भंडे, मानसी चनावार, नीलिमा पेन्सलवार, प्रा. मनोज गुरडे, श्रीकांत खंदारे, निलेश बाहेती, राजकुमार महिंद्रकर, सोमशेखर चिल्लरगे, ईश्वर समगे, नवनाथ जोगी, सरस्वती चौधरी, सुरेखा नाईक, सुनीता पेन्सलवार, सुनिता बिरादार, देवकी शेटकार व चंचला हुगे यांनी केले आहे.