उदगीर शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी गृहराज्य मंत्री तथा लोकप्रिम आमदार संजयजी बनसोडे यांच्या शुभहस्ते करण्याचे आयोजन

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरा विविध वार्डातील विविध विकासकामांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्य मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार संजयजी बनसोडे यांच्या शुभहस्ते बुधवार दि २८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता नळेगाव रोड उडाणपुल येथे विकास कामाचा शुभारंभ करण्याचे आयोजन केले आहे . या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस बसवराजजी पाटील नागराळकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर तालुकाध्यक्ष तथा उदगीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव मुळे , उदगीर विधानसभा अध्यक्ष प्रा प्रवीणजी भोळे , व उदगीर शहर कार्याध्यक्ष गजाननजी सताळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .
तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व माजी नगरसेवक , माजी जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शहर व तालुका, जिल्हा व प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभाग, राष्ट्रवादी सांस्कृतिक विभाग, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल , राष्ट्रवादी ओबीसी विभाग,राष्ट्रवादी व्हीजेएनटी विभाग, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी डॉक्टर्स विभाग, राष्ट्रवादी कामगार विभाग व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदगीर शहराध्यक्ष समीर शेख यांनी केले आहे.

About The Author

error: Content is protected !!