भाकसखेडा येथे ड्रोनद्वारे ऊस पिक फवारणी प्रात्यक्षिक

भाकसखेडा येथे ड्रोनद्वारे ऊस पिक फवारणी प्रात्यक्षिक

उदगीर (एल.पी.उगीले) : भाकसखेडा ता.उदगीर येथे विलास सहकारी साखर कारखाना युनिट 2 तोंडार यांच्या सौजन्याने ड्रोनद्वारे ऊस पीक फवारणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. येथील मंडळ अधिकारी पंडित जाधव यांच्या शेतातील ऊस पिक फवारणी प्रात्यक्षिक करून दाखविले.

विलास साखर कारखाना तोंडारच्या वतिने कमी मेहनतीवर जास्त उत्पन्न कसे काढता येईल? व शेतकऱ्यांना कमी मेहनतीत कसे परवडेबल होईल, असा प्रयत्न चालू आहे.ऊसाला फवारणी करण्याची जोखमीची मेहनत असून यावर उपाय म्हणून ऊस पिकाला फवारणी करण्यासाठी ड्रोन सर्वात सोपा उपाय आहे.

शेतकऱ्यांनी ड्रोन द्वारे फवारणी करुन मेहनतीत कपात करावी.यासाठी भाकसखेडा येथील शिवारात ऊसाला ड्रोनद्वारे कशी फवारणी करावी याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. ड्रोन द्वारे जे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले, त्या ड्रोनचे पायलट शैलेश साळवी ,अभय जाधव.आनिकेत आवळेकर यांनी ऊस फवारणी प्रात्यक्षिक दाखवले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.आर. पवार होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामराव बिरादार, युवराज जाधव, कार्यकारी संचालक अनंत बारबोले , अनिल पाटील, चेअरमन अशोक माने, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गजानन बिरादार,शेतकी अधिकारी पाटील, शशीकांत बुलबुले,शाखा तपासणीस अण्णासाहेब मुळे, पार्थ मुंडे, बालाजी कांबळे, तुकाराम दंडे,गटसचिव दता सुर्यवंशी, ज्ञानेश्वर बिरादार, हंसराज मोमले, मंडळ अधिकारी पंडित जाधव, चेअरमन विवेक जाधव, उपसरपंच अरविंद मोरे, उपस्थित होते. यावेळी ड्रोन द्वारे फवारणी बाबत मार्गदर्शन पार्थ मुंडे, ए.आर पवार, कल्याण पाटील. अनंत बारबोले यांनी केले. यावेळी भाकसखेडा सह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने ड्रोन प्रात्यक्षिक पाहण्यासाठी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी पंडित जाधव यांनी केले. तर आभार प्रदर्शन अहमदखा पठाण केले.

About The Author