दुग्धशास्त्रातील संधी ओळखा – प्रा.डॉ. श्रीकांत कल्याणकर

दुग्धशास्त्रातील संधी ओळखा - प्रा.डॉ. श्रीकांत कल्याणकर

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील दुग्धशास्त्र विभाग अंतर्गत डेअरी सायन्स क्लबच्या उद्घाटनाचा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयातील प्रा.डॉ. श्रीकांत कल्याणकर यांनी विद्यार्थ्यांना दुग्धशास्त्रातील चितळे, वारणा, राजहंस व गोकुळ तर जागतिक पातळीवरील अमूल सारख्या डेअरीचे उदाहरण देऊन या क्षेत्रातील संधी विद्यार्थ्यांनी शोधाव्यात असा सल्ला दिला. उदगीर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी दुग्धशास्त्रात अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण दिले जाते, हे विद्यार्थ्यासमोर सांगितले.

उपप्राचार्य डॉ. आर.के.मस्के यांनी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा परिचय देऊन शिस्तीचे पालन करण्याबरोबरच मोबाईल सोडून ग्रंथाकडे व ग्रंथालयाकडे वळण्याचा सल्ला दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुग्धशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुरेश लांडगे यांनी केले, तर सूत्रसंचालन कुमारी वैष्णवी हिने केले. तर आभार प्रदर्शन प्रथमेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागातील प्रा.डॉ.जे.सी.तोंडारे, प्रा.डॉ. ए.एस.होनकर, प्रा.व्ही.बी.रंगवाळ व प्रा. सुजाता गायकवाड तसेच सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

About The Author