शिवसंप्रदाय किर्तनकार प्रवचनकार मंडळाचा प.महाराष्ट्र जनसपंर्क अभियान शुभारंभ
उदगीर (एल.पी.उगीले) : शिव संप्रदायचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय शिवसंप्रदाय किर्तनकार प्रवचनकार मंडळाचा प.महाराष्ट्र जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ उदगीर येथे झाला.
संत शिरोमणी मन्मथ स्वामी यांनी शिव संप्रदाय सुरु केला, ही शिवसंप्रदाय परंपरा राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वाढवली. यानंतर शिवसंप्रदाय टिकवणे व वाढवण्यासाठी अखिल भारतीय शिवसंप्रदाय किर्तनकार, प्रवचनकार मंडळाने समाजाचे संघटन करुन शिवसंप्रदायाचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय शिवसंप्रदाय किर्तनकार, प्रवचनकार मंडळ महाराष्ट्रातील सर्व भागात जाऊन करणार आहे.
या जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ बुधवार दि.28 सप्टेंबर रोजी महादेव मंदिर हरकरे नगर उदगीर येथे राष्ट्रसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे 83वे श्रावणमास अनुष्ठाण सयोंजन समितीचे अध्यक्ष राम मोतीपवळे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून झाले.यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, जेष्ठ विधिज्ञ अॅड एस.टी.पाटिल चिघळीकर,सेवानिवृत्त मुख्याध्यापक बि.एम बिरादार, शिवसंप्रदायिक किर्तनकार, प्रवचनकार मंडळाचे अध्यक्ष शि.भ.प. शिवराजप्पा नावंदे गुरुजी, उपाध्यक्ष शि.भ.प. बाबुराव महाराज सोनटक्के, सचिव शि.भ.प. राजेश्वर महाराज स्वामी लाळीकर,पंचय्या स्वामी, गंगाधर बिरादार, बाबुराव चिमेगावे,अहमदपुर ता. अध्यक्ष शि.भ.प. विश्वांभर बडुरे, जळकोट तालुका अध्यक्ष शि.भ.प. मारोती महाराज भालके जळकोट, बिलोली तालुका अध्यक्ष भिमराव पटणे बावलगाव, नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील वन्नाळी, उदगीर तालुका अध्यक्ष दयानंद नागापल्ले,लातुर जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पाटील,येरोळकर,देवणी तालुका अध्यक्ष संगमेश्वर महाराज बिराजदार वलांडीकर, कैलास महाराज जामकर डोंगरगावकर, लातुर जिल्हा उपाध्यक्ष संजय महाराज लिंबाळवाडीकर, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष विनोद मोरखंडे, शि.भ.प. रामलिंग बुलबुले सामनगाव आदी किर्तकार प्रवचनकार मंडळी या अभियानात सहभागी झाले आहे. हे जनसंपर्क अभियान सोलापुर,ईचलकरंजी,सांगोला,सांगली, सातारा,कोल्हापूर वाई आदी भागात जनसंपर्क अभियानातून समाजाचे संघटन व शिव संप्रदायाचा प्रचार व प्रसार करणार आहे.