शहरातील शेवटच्या घटकापर्यंत विकास निधी पोहोचवणार : माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे
आण्णाभाऊ साठे सभागृहासाठी ५० लाख रुपयाचा निधी मंजुर
उदगीर (एल.पी.उगीले) : शहरातील नागरिकांना विविध योजनेच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर केला असून, येत्या काळात शहराचा चेहरा मोहरा बदलून उदगीर शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जाईल. यासाठी शहरातील शेवटच्या घटकापर्यंत विकास निधी पोहोचवणार असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते संजय नगर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेश्वर निटुरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजुरखाॅ पठाण, शहराध्यक्ष समीर शेख, नगर परिषदेचे काझी, मनोज कपाळे, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, इब्राहिम शेख, सय्यद जानी,फय्याज शेख, बन्सीलाल कांबळे,संघशक्ती बलांडे, प्रदीप जोंधळे, विनोद कपाळे, कल्याण कपाळे, धिरज कसबे, जवाहरलाल कांबळे, रामेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी संजयनगर व फुलेनगर येथील असलेल्या अडचणी भविष्यकाळात सोडवणार असुन त्यामध्ये पाणी पुरवठा योजनेतून नळ कनेक्शन, विविध भागातील सीसी रस्ते, सभागृह, गोरगरिबांसाठी घरकुलाची योजना, यासह विविध योजना आपल्या दारापर्यंत पोहोचवणार आहे. यासाठी स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने आपल्या समस्या सोडवणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप जोंधळे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह संजय नगर व फुलेनगर येथील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.