माऊली कॉलेज ऑफ फार्मसी, तोंडार येथे फार्मसी दिवस निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

माऊली कॉलेज ऑफ फार्मसी, तोंडार येथे फार्मसी दिवस निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील माऊली कॉलेज ऑफ फार्मसी, तोंडार येथे फार्मसी दिवस निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन माऊली कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रुपम देवलीया यांच्या हस्ते रक्तदान करून करण्यात आले. या वेळी त्यांनी रक्तदान चळवळीत तरुणांचे योगदान अत्यंत महत्वाचे असून त्यांनी वेळोवेळी रक्तदान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.विशेषत: आरोग्य क्षेत्राशी निगडीत विद्यार्थ्यांची ही जबाबदारी असून प्रत्येक तीन महिन्यांनी तरुणांनी या आरोग्य चळवळीत आपला सहभाग नोंदविला पाहिजे म्हणून नमूद केले. तरुणींनी या शिबिरात सहभाग घेतला पाहिजे जेणे करून त्यांच्या शरीराच्या हिमोग्लोबिनची पातळी समतोल राहायला मदत होईल.

या शिबिरात शंकर गोडे,अजय चव्हाण,वैष्णवी शिंदे अक्षय धूप्पे ,मारुती चव्हाण,पूजा पाटील,विशाल पवार,कोळसुरे श्रीपाल,सलीम शेख,वैभव भालेराव,योगेश ठाकूर,श्रीकांत जाधव,विकास हत्त्ते,ओम अलापुरे,विजयकुमार यलवंतगे,संतोष गौंड,कामरान शेख,सुधाकर वाघमारे,व्यंकटेश बैस,अरुण गाढवे,विशाल दिवटे,असिफ डांगे,ज्ञानेश्वर सपनोरे,आदित्य मरेवार,शशिकांत जांभळकर,डॉ रूपम देवलिया,पटवारी अनिकेत,अंबादास कोमपल्ले,जलप्‍पा बिरादार,बलदीप नरवडे,प्रियंका गायके,सिद्धेश्वर पळसकर,दर्शन स्वामी,गंगाराम करताळे,समीर शेख,गोपीनाथ कांबळे ,रितेश एकलिंगे,पंकज गरीबे,वीरेंद्रसिंग कचवे,चैतन्य बिरादार,अनिकेत घेरे या विद्यार्थ्यांनी रक्तदान करून फार्मसी दिवस साजरा केला.

या शिबिरासाठी नागप्‍पा अंबरखाने ब्लड बँक उदगीरच्या वतीने डॉक्टर शेटकार बसवराज,ओमकार गांजुरे,सोमनाथ स्वामी,सपना कांबळे,विनायक टकटवळे,राजू ढोबळे यांनी सहकार्य केले.

About The Author

error: Content is protected !!