वाढवणा पाटी जवळ नांदेड- बिदर राज्य मार्ग रस्त्यावर खड्डेच खड्डे
वाढवणा (हुकूमत शेख) : पासुन फक्त अवघ्या तीन कि.मी. अंतरावर असलेल्या नांदेड- बिदर राज्य मार्ग क्रमांक 249 ह्या रस्त्यावर नांदेड ते बिदर सीख बांधव दररोज बिदर गुरुद्वारास जातात. नांदेड, लोहा, अहमदपूर, शिरूर ताजबंद, हाळी हंडरगुळी, वाढवणा पाटी मार्ग उदगीर कडे असंख्य चारचाकी, दहा टायर ट्रक, ट्रॅकटर महामंडळाची बस, दुचाकी, ऑटो असे असंख्य वाहने या राज्य मार्गांवरून धावतात.
हजारो प्रवासी नांदेड – उदगीर, उदगीर ते नांदेड रुग्णालयासाठी, शिक्षणा साठी खरेदी विक्री करण्यासाठी असंख्य व्यापारी या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र हा रस्ता एवढा खड्डेमय बनला असुन रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते कळायला मार्ग नाही.
वाढवणा पाटीला देखील अनेक उद्योग धंदे, मोठमोठी कापडं दुकान, होलसेल किराणा दुकान विशेष म्हणजे अनेक खेड्या तांड्यावरील चारचाकी, दोनचाकी मोटार सायकल, ट्रॅकटर, ट्रक, साठी कुबेर पेट्रोल पपांवर पेट्रोल, डिझेलसाठी रात्र दिवस वहानाची लाईन या रस्त्यावर असताना देखील अनेक दिवसा पासुन या 249 राज्य मार्ग रस्त्यावर संबंधित खाते साधे खड्डे देखील बुजवत नाही. या मुळे नवीन वाहने खड्ड्यात पडून अपघात होत आहेत. कधी खड्डे चुकवण्याच्या नादात देखील वाहने पलटी होऊन नुकसान होत असल्याची चर्चा चालका कडून होताना दिसत आहे.