उदयगिरीचे टेबल टेनिस पुरुष व महिला स्पर्धेत दुहेरी विजेतेपद
उदगीर (एल.पी.उगीले ) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने “आजादी का अमृत महोत्सव” आणि महाविद्यालयाचे “हिरक महोत्सवी वर्ष” निमित्त ‘ब’ विभाग आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस (पुरुष / महिला) स्पर्धा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील इनडोअर हॉलमध्ये संपन्न झाल्या. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील पुरुष व महिला टेबल टेनिस संघांचा समावेश होता. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, डॉ. तात्याराव केंद्रे, प्रा. निहाल खान, डॉ. राजेश्वर पाटील, क्रीडा संचालक प्रा. सतीष मुंढे आदी उपस्थित होते. टेबल टेनिस पुरुष स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीरचा संघ प्रथम आला असून देगलूर महाविद्यालय, देगलूरचा संघ द्वितीय आला आहे तर शिवाजी महाविद्यालय, उदगीरचा संघ तृतीय आला आहे. महिला टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर – प्रथम, शिवाजी महाविद्यालय,उदगीर – द्वितीय क्रमांक संपादित केला. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील टेबल टेनिस पुरुष विजेत्या संघात रितेश तुकडे, माजीद देशमुख, अंकित जाधव, रुपेश तुकडे, खाजा शेख यांचा समावेश होता तर टेबल टेनिस महिला संघात वर्षाराणी बोडके, समृद्धी कांबळे, लीना कोमटे, शिवानी श्रीरामे, मानसी स्वामी यांचा समावेश होता. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रा.डॉ.सचिन चामले, प्रा.डॉ.शिवानंद पाटील, प्रा.डॉ.दत्ता मुंडे, प्रा.सचिन चौधरी, गुल्फराज शेख, सोनल उदबळे, सिराज पठाण, प्रा.रोहन ऐनाडले यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंढरीनाथ तेली यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.गौरव जेवळीकर यांनी तर आभार क्रीडा संचालक प्रा.सतीष मुंढे यांनी केले.