निडवंचे कुटुंबियाचे आ.संजय बनसोडे यांच्याकडून सांत्वान

निडवंचे कुटुंबियाचे आ.संजय बनसोडे यांच्याकडून सांत्वान

शासन मदत तात्काळ करण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे करडखेल येथील शेतकरी अनिल राम निडवंचे यांनी सततची ना पिकी, अतिवृष्टी व कर्जदार असल्याकारणाने निराश होवून आंबाच्या झाडाला गळफास घेऊन परवा आत्महत्या केली असल्याचे वृत्त माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांना समजताच त्यांनी करडखेल येथील अनिल निडवंचे यांच्या निवासस्थानी भेट देवून निडवंचे कुटुंबियांचे सांत्वान करुन आधार दिला व मी सदैव आपल्या कुटुंबीयासोबत असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी निडवंचे यांची आई ,वडील ,पत्नी , दोन मुले उपस्थित होते. त्यांना 0.82 हेक्टर शेती असून त्यांच्या शेतीवर त्यांनी हेर येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील १८ हजार रूपयाचे कर्ज घेतले होते.

आपल्या मतदार संघात शेतकऱ्याची सततच्या ना पिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजताच आ.बनसोडे यांनी त्यांच्या कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेतली व परिस्थिती जाणून घेवुन तात्काळ तहसीलदार यांच्या कडुन प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करुन पुढील कार्यवाही करून लवकरात लवकर शासन मदत करण्यासाठी संबंधितांना सुचना दिल्या.

याप्रसंगी आ.संजय बनसोडे यांनी आपण सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून येत्या काळात शेतकऱ्यांच्या व त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करण्यासाठी मी प्रथम प्राधान्याने काम करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष कल्याण पाटील, कुणाल बागबंदे, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर, मंडळ अधिकारी पंडित जाधव, सरपंच, उपसरपंच, बीट अंमलदार, सुरेश निडवंचे, दिलीप निडवंचे आदी उपस्थित होते.

About The Author