राज्यातील सहकार क्षेत्रात लातूर जिल्हा बँक प्रथम क्रमांकावर घेवुन जाणार – दिलीपराव देशमुख
निलंगा तालुक्यातील कोतल शिवणी येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन प्रशस्त इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न
लातूर (प्रतिनिधी) : राज्यात सहकार चळवळीसाठी बॅरिस्टर गाडगीळ यांनी सूतगिरणी, पतसंस्था, सोसायटी यांचे बारकावे निर्माण करण्याचे काम केले त्याला मूर्त स्वरूप आणण्याचे कार्य माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, सुधाकरराव नाईक यांच्या दूरदृष्टीने सहकार चळवळ वाढवली आहे राजकारण हे समाजकारनासाठी असून समाजाला आर्थिक सुबत्ता दिली तरच त्याचा उपयोग असून त्या दृष्टीने लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तब्बल बिनव्याजी १७५० कोटी रुपयांची पिक कर्ज वाटप करून राज्यात अव्वल स्थानावर झेप घेत असताना नियम मोडला नाही पण थोडा वाकवून व्यवहारात पारदर्शकता ठेवत जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या मुलांना वैधकिय शिक्षणासाठी ३० लाख रुपये कर्ज देवुन शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करत खांद्यावरील संसाराच ओझ त्याला मदत करण्याची भूमिका लातूरच्या सात मजली बँकेची राहिलेली आहे यापुढे राहील असे सांगून राज्यातील सहकार क्षेत्रात लातूर बँक क्रमांक १ वर आणण्यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे अशी माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी यावेळी सांगितले ते निलंगा तालुक्यातील कोतल शिवणी येथील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नूतन प्रशस्त इमारतीचा उद्घाटन सोहळा त्यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख हे होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर, प्रमुख अतिथी म्हणून निलंगा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी वसंतराव पाटील, यांची उपस्थिती होती.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात चाकूरकर, निलंगेकर, विलासराव देशमुख यांचे योगदान
लातूर जिल्ह्याच्या सर्वागीण विकासाच्या बाबतीत मोठे योगदान राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख केंद्रीय भूतपूर्व गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे राहीलेले आहे असे सांगून दिलीपराव देशमुख साहेब म्हणाले की सिंचन व्यवस्था वाढली व्यापार वाढला जिल्ह्यातील साखर कारखाने ऊभे राहिले नफ्यात सुरु आहेत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम मांजरा परिवार व जिल्हा बँकेच्या मदतीने सुरू आहे आर्थिक सुबत्ता देण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रगतीकडे घेवून जाण्यासाठी मोठा हातभार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेगवेगळ्या योजनेतून शेतकऱ्यांना मिळत आहे उसाची मोठी लागवड ड्रीपने पाणी देत आहेत कारखाने अधिक भाव दिल्याने आर्थिक क्रांती बघावयास मिळत आहे असे सांगून नूतन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख व त्यांचे संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली चांगले निर्णय घेत असून त्यांच्या कार्याचे कौतुक करत बँकेच्या वेगवेगळ्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी केले.
विकासाचा वारसा जपत जिल्हा बँक मार्गक्रमण करीत आहे – चेअरमन आ.धीरज देशमुख
लोकनेते विलासराव देशमुख साहेब सहकारमंत्री असताना व आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब बँकेचे चेअरमन असताना छोट्याशा गावात ही कोतल शिवणी येथे शाखा सुरू झाली ज्यांनी सुरू केली दिलीपराव देशमुख साहेब त्यांच्याच हस्ते देखन्या प्रशस्त इमारतीचा शानदार उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे आज शाखेची ही नवी देखणी वास्तू उभी राहिली. या शाखेतून 8 गावांचा ०यवहार चांगल्या पद्धताने सुरु असून यापुढील काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक सेवा देण्याचा प्रयत्न बँक करणार आहे असे सांगून चेअरमन आमदार धीरज देशमुख म्हणाले की, जिल्हा बँकेने 5 लाख बिनव्याजी कर्ज योजनेचा निर्णय घेतला. नवीन संचालक मंडळाने तो अंमलात आणला. या योजनेमुळे आज शिवणी कोतल येथील शाखेत 6 कोटी 24 लाख रुपयांचे वाटप केले. गेल्यावर्षी पेक्षा 4 कोटी अधिकचे वाटप झाले आहे. पीकक्षेत्र व कर्ज मर्यादा वाढविल्याने या बिनव्याजी कर्ज योजनेमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा झाला. शेतकरी हितासाठी योजनेत सुलभता आणण्याचे काम केले आहे. बँकेकडे आलेला शेतकरी परत जावू नये, त्याची अडचण सुटावी, त्याला त्याच्या क्षमतेप्रमाणे पत मिळेल, याची व्यवस्था बँकेने केली आहे.लातूर जिल्हा बँक आपले बँकिंग व्यवहार सांभाळत शेतकरयांना सर्वाधिक साडे सतराशे कोटी रुपयांचे वाटप केले. यामुळे शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा थेट लाभ झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्यासाठी जे काही करू पाहत आहेत, त्याना बळ दिले पाहिजे. विकासाचा वारसा आपण जपला आहे, टिकवला आहे. त्या विकासाच्या कामावर मार्गक्रमण करीत आहोत. यापुढें जावून जिथे शाखा नाही तिथे फिरत्या वाहणाद्वा रे बँकिंग सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे स्वप्न पुर्ण करण्याची जिल्हा बँक कटिबध्द
यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष आमदार धीरज देशमुख यांनी ग्रामीण भागात बँकेच्या सर्व सोयी पोहचविण्यासाठी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नाबार्डच्या सहकार्याने Bank on wheel या फिरत्या शाखा सुरु केल्या आहेत. गावांच्या मागणीनुसार तशा सोयी, सुविधा तसेच गरजेनुसार पतपुरवठा करू. जिल्हा बँकेच्या माध्यमातून तुमचे स्वप्न साकार करू, सर्वसामान्य, शेतकरी यांच्या सेवेसाठी बँक कटिबद्ध राहील असे यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश काँग्रेस सचिव अभय साळुंके, अशोकराव पाटील निलंगेकर, वसंतराव पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर माजी आमदार अँड त्रिंबक नाना भिसे, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजुळगे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव संचालक पृथ्वीराज शिरसाठ, व्यंकटराव बिरादार, राजकुमार पाटील अशोकराव गोविन्दपुरकर, जयेश माने, दिलिप पाटील नागराळकर , अनुप शेळके, संचालिका सौ सपना कीसवे, सौ अनिता केंद्रे, कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव, माजी सभापती मधुकरराव पाटिल अँड अजित माने, बँकेचे माध्यम समन्वयक हरीराम कुलकर्णी, जिल्हा काँग्रेसचे समन्वयक सचिन दाताळ,आबासाहेब पाटील, पंकज शेळके, बँकेचे माजी संचालक संभाजीराव सुळ, माजी उपनगराध्यक्ष चांदपाशा इनामदार, सतीश पाटील वडगावकर, रामदास पवार, देशमुख, विविध मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रमोद जाधव यांनी केले आभार प्रदर्शन बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ यांनी मांडले कार्यक्रमास कोतल शिवनी वडगाव, तूपडी, आनंदवाडी, मसलगा आंबेगाव,येथील शेतकरी सभासद विविध संस्थांचे प्रतिनिधी शेतकरी सभासद ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.