हिंदी भाषा प्रयोगशाळेचा नाही; तर ती समूहमनाचा आविष्कार आहे – डॉ. पांडुरंग चिलगर

हिंदी भाषा प्रयोगशाळेचा नाही; तर ती समूहमनाचा आविष्कार आहे - डॉ. पांडुरंग चिलगर

गांधी महाविद्यालयात ‘हिंदी दिवस’ कार्यक्रम व हिंदी साहित्य मंडळाचा उद्घाटन समारंभ संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : हिंदी केवळ साहित्याची भाषा नव्हे. तर, ती जनमानसाच्या उपजिविकेची भाषा आहे. आजच्या काळात हिंदी भाषेने आपले अस्तित्व सातासमुद्रा पार सिद्ध केले आहे. ही भाषा कोणत्या प्रयोगशाळेत नाही तर, जनसमूहाचा आविष्कार आहे. असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरच्या हिंदी विभागातील प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी साहित्य मंडळाची स्थापना व हिंदी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हिंदी साहित्य मंडळाचे उद्घाटन हिंदीचे अभ्यासक तथा अनुवादक डाॕ. पांडुरंग चिलगर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्या कैप्टन डॉ. अनिता शिंदे होत्या. तर, विचार मंचावर विचार विकास मंडळाचे सदस्य सुरेशराव देशमुख हिंदी विभाग अध्यक्ष डॉ राजश्री भामरे लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. दिलीप बंजारा अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजश्री जाधव, मराठी विभागाचे सूर्यवंशी यांच्यासह बी लावणे प्रा. हनुमंत खिंडीवाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम दीप प्रज्वलन करून महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. हिंदी विभागाची विद्यार्थिनी कु.श्रध्दा थिट्टे हिने हिंदी भाषेचे महत्त्व आणि हिंदीची आजची स्थिती या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी डॉ. पांडुरंग चिलगर पुढे बोलतांना म्हणाले की , हिंदी भाषेचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान होते तत्कालीन काळातील साहित्यकांनी क्रांतिकारकांबरोबरच आपल्या वैचारिक साहित्याच्या माध्यमातून जनमानसात राष्ट्रप्रेम जागृत केले म्हणूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. महात्मा गांधींनी हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा देऊन स्वतंत्रता आंदोलनाची माध्यम भाषा म्हणून आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान दिले. याबरोबरच संत कबीरदास, मीराबाई यांच्या साहित्याची प्रासंगिकता व हिंदी भाषाची आवश्यकता याबद्दलही विद्यार्थांना अनमोल माहिती देऊन मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रभारी प्राचार्या कॅप्टन डॉ. अनिता शिंदे यानी विद्यार्थ्यांना भाषा ,संस्कृती व व्यक्तिमत्त्व विकासाचे सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक हिंदी विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. राजेश्री भामरे यांनी केले. सूत्रसंचलन बी. कॉम प्रथम वर्षाची विद्यार्थीनी कु. यशवंती वाघमारेने तर, आभार सुमीत काळे या विद्यार्थ्यांने मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author