विकासाचे दृष्टी असलेले संचालक मंडळ सर्वांचीच प्रगती करतात – आ. संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : कोणत्याही सहकारी संस्थेमध्ये संचालक मंडळ जर दूरदृष्टीचे आणि विकासाची जाण असलेले असेल तर प्रगतीचा कळस गाठता येतो. याचे जिवंत उदाहरण म्हणून उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळांनी केलेली उल्लेखनीय प्रगती पाहता येऊ शकेल. असे गौरवोउद्गार माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय बनसोडे यांनी काढले.
ते उदगीर तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे हेही उपस्थित होते. याप्रसंगी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे, सचिव सर्जेराव भांगे, उपाध्यक्ष काळे नंदकिशोर यांच्यासह संचालक मंडळातील अरविंद धानुरे, माधव अंकुशे, शिवाजी बिरादार, बालाजी धामणसुरे,विजय गबाळे, शांताबाई लोहारे तसेच शिक्षक नेते निळकंठ पाटील, लक्ष्मण दापके, अरुण बिरादार, पेद्देवाड, रविकिरण बलुले, महेश वासरे, के. पी. बिरादार, शिवलिंग मार्गेपवार, बालाजी बरुरे, टेकाळे, शिवाजी इंचूरे, सचिन मुरके, ढगे आर.पी., मोठेराव चंद्रकांत, बालाजी कदम इत्यादींनी या पतसंस्थेच्या विकासासह सदस्यांचे हित जोपासून उल्लेखनीय कार्य केले आहे.
पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले की, विकास करणाऱ्यांना सर्वांनी साथ द्यावी. राजकारण किंवा विरोधासाठी विरोध हा विषय बाजूला ठेवावा, मी उदगीर विधानसभा मतदारसंघाचा आमदार असताना देखील या शिक्षक पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मला उदगीर, देवनी आणि जळकोट या तिन्ही तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या अडचणी दूर करण्यासाठी निधी मागितला, शैक्षणिक प्रगतीचा विषय डोळ्यासमोर ठेवून क्षणाचाही विचार न ठेवता मी लगेच निधी दिला. आणि भविष्यातही निधी देणार असल्याची घोषणा केली आहे.
याप्रसंगी बोलताना काँग्रेसचे नेते निटूरे यांनी स्पष्ट केले की, या पतसंस्थेच्या विकासासाठी माझ्या परीने जे जे म्हणून शक्य असेल ते सर्व प्रयत्न मी करेन. या पतसंस्थेने उल्लेखनीय प्रगती केली आहे. या पतसंस्थेची वाटचाल बँकेच्या दिशेने होत आहे. पतसंस्थेने आ. बनसोडे यांच्या हस्ते अँप चे उद्घाटन केले आहे. तसेच सभासदांना 25 लाख रुपये कर्ज मर्यादा वाढवून दिली आहे. एक नोव्हेंबर पासून व्याजदर दहा टक्के करणार आहेत. शैक्षणिक लोन फक्त सहा टक्के दराने एक लाखापर्यंत दिले जाणार आहे. आकस्मिक कर्ज 40 हजार रुपये तर दिवाळीचे कर्ज 25 हजार रुपये ठेवले आहे. यासोबतच कन्यादान योजनेत 11 हजार रुपयांचा चेक दिला जाणार आहे.
त्यासोबतच पतसंस्थेच्या सदस्यांसाठी कमीत कमी खर्चामध्ये सदस्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रयत्न केले जात आहेत. प्रगती उल्लेखनीय आहे, असे सांगितले. या पतसंस्थेचे सचिव सर्जेराव भांगे यांनी पतसंस्थेच्या विकासाचा आलेख मान्यवरांसमोर मांडला.