चला देऊ मदतीचा हात कोविड मृतांच्या कुटुंबियांच्या जीवनात – डॉ नरसिंह भिकाणे

चला देऊ मदतीचा हात कोविड मृतांच्या कुटुंबियांच्या जीवनात - डॉ नरसिंह भिकाणे

अहमदपूर (गोविंद काळे) : ‘चला देऊ मदतीचा हात कोविड मृतांच्या कुटुंबियांच्या जीवनात’ असे म्हणत राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पासून मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी अडचणीतील शेतकरी व शेतमजुरांना घरपोच आकरा हजार रुपयांची मदत केली असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांनी अहमदपूर येथील विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये त्यांनी विविध गावच्या दहा शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील व्यक्तींना तब्बल सव्वा लाख रुपयांची आर्थिक मदत गावोगाव भेटी देत केली आहे. पेरणीमुळे व नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी कुटुंब कोविड मध्ये घरचा कर्ता माणूस गेल्याने अडचणीत आले होते त्यांना योग्यवेळी डॉ भिकाणे यांनी हा छोटासा आर्थिक आधार दिला आहे. अनेक मोठे नेते शेतकऱ्यांचे कोरडे सांतवन करत असताना डॉ भिकाणे यांनी जिल्ह्यातील पुढाऱ्यांना आदर्श घालून देत फक्त अडचणीतील कुटुंबांना घरी जाऊन भेटून फोटो काढू नका तर आर्थिक मदतही करा असा संदेश या शेतकरी मदत अभियानातून देत मदतीचा एक अहमदपूर प्याटर्न निर्माण केला आहे. निवडणूक प्रचारात कोट्यावधी रुपये दारू कोंबड्यावर उधळणाऱ्या नेत्यांनी आकडात शेतकरी शेतमजूर यांना मदत करायला काहीच हरकत नाही असे मत डॉ भिकाणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या अभियानांतर्गत त्यांनी अहमदपूर तालुक्यातील मानखेड (संतुकराव सांगुळे,रमाकांत गायकवाड) सोनखेड (रघुनाथ घोटमुकले), पाटोदा (रमेश खाडे), कोपरा(भानुदास देपे), सताळा(देविदास चंदे), अंधोरी (दिलीप पडिले), चाकूर (ताजुद्दीन शेख) सह लातूर तालुक्यातील बाभळगाव (आशिष येनकर) व निलंगा तालुक्यातील शेडोळ (विश्वनाथ धुमाळ) आदी गावातील शेतकरी व शेतमजुरांना प्रत्येकी अकरा हजार रुपयांची मदत केल्याची माहिती दिली. यापैकी एक कुटुंबाला त्यांनी पंचवीस हजारांची तर बाकी कुटुंबांना आकरा हजारांची मदत केली आहे. यामुळे ग्रामीण भागात त्यांच्याविषयी लाख मोलाचा माणूस लाख मोलाची मदत अशी भावना शेतकरी व शेतमजूर यांच्यामध्ये निर्माण झाली आहे कारण सद्याच्या महागाईच्या काळात सख्खा भाऊही भावाला एक रुपयाची मदत करण्यास पुढे येत नाही तिथे अनोळखी घरात अचानक पोहचत डॉ भिकाणे मदत करत आहेत. अडचणीतील जनतेसाठी पुढे येणे व आपल्या कमाईचा काही भाग जनतेसाठी देणे ही माझी व्यक्तिशः आवड आहे जी मी राजकारणात ही जोपासली आहे असे डॉ भिकाणे यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. त्यामुळेच मी चळवळीच्या वीस वर्षांत शेकडो मोफत आरोग्य शिबिरे राबवली, दुष्काळात गावोगाव मोफत पाणी टँकर दिले व अशी अनेक समाजहिताची काम केली आहेत असेही त्यांनी सांगितले. त्यामुळेच त्यांना बँकॉक, दिल्ली, मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद, नांदेड, लातूर अश्या अनेक ठिकाणी एकूण छत्तीस आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कारांचा मिळाले आहेत.डॉ भिकाणे म्हणाले की चळवळीचा अहमदपूर प्याटर्न निर्माण होणे गरजेचे आहे ज्यामध्ये जनतेला विविध समस्यांमध्ये मदत करण्यासाठी सदोदित सातत्याने विविध लोकांचे शेकडो हात पुढे आले पाहिजेत तर आणि तरच शेवटच्या घटकाला ही मदत होईल. या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष उमेश रेड्डी, तालुका संघटक धोंडीराम इरलापल्ले, तालुकाउपाध्यक्ष ज्ञानोबा जाधव, उत्तम मुरकुटे, तालुका सचिव उल्हास पाटील, विभागाध्यक्ष गजानन पांगरे, अतिष गायकवाड आदी उपस्थित होते.

About The Author