बहुजन समाजातील लोकांनी मनुवाद्याऺचे घटना बदलण्याचे षडयंत्र हाणुन पाडावे – आ. बाबासाहेब पाटील

बहुजन समाजातील लोकांनी मनुवाद्याऺचे घटना बदलण्याचे षडयंत्र हाणुन पाडावे - आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित ६६ वा धम्मचक्र परिवर्तन दिन सोहळा दि. ०५/१०/२०२२ रोजी सकाळी- ११: ३० वाजता अहमदपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर जवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौकात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट चे जिल्हाध्यक्ष जेष्ठ नेते बाबासाहेब कांबळे हे होते तर उद्घघाटक म्हणून अहमदपूर-चाकुर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील हे आपल्या उदृघाटकपर भाषणात म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, या सर्व महाविभुतीने केलेल्या कार्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज भारत देशात लोकशाही नांदते आहे.भारताच्या राज्यघटने सारखी अन्य देशांची घटना नाहीच.भारत देशांचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन लिहिले असून सर्व बहुजन समाजातील लोकांना या संविधाना मुळे आपले अधिकार मिळवून दिली आहेत. त्यामुळे बहुजन समाजातील लोकांनी मनुवाद्याऺचे घटना बदलण्याचे षडयंत्र हाणुन पाडावे आणि आपली ताकद या मनुवाद्याना दाखवून द्यायचीय आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून मिसळून एकत्र लढा देऊत.भगवान गौतम बुद्ध यांचे पंचशिल जगाने मान्य केले आहे म्हणून त्या देशात आज गौतम बुद्धाचा शांतीचा धम्माचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे तसाच बुद्ध धर्माचा प्रसार भारतात सुद्धा व्हावा असे आपण काहीतरी केले पाहिजे.असे आपल्या उदृघाटकपर भाषणात आ.बाबासाहेब पाटील म्हणाले.

भगवान गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान जगात श्रेष्ठ आहे त्याला तोड नाही म्हणून आपण सर्वांनी बुद्ध धम्माचे पंचशीलाचे आचरण करावे. असे भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाक्के हे आपल्या भाषणात म्हणाले या कार्यक्रमात पंचशील ध्वजारोहण यांच्याच हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमांचे अध्यक्ष रि.पा.ई.चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की युवकांनी पुढाकार घेऊन बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार गावा गावात जाऊन बौद्ध धम्माचे कार्य करण्यासाठी एकत्र येऊन काम करावे.आणि त्यामुळे समाज आपल्या बौद्ध धम्मा विषयी अधिकच जागरूक होईल. सर्व समाजातील लोकांनी. आता जागरूक होण्याशिवाय पर्याय राहिला नाही.असे अध्यक्षीय भाषणात बाबासाहेब कांबळे म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर भाषण या कार्यक्रमाचे संयोजक व आयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी भाषण केले. त्यानंतर भाजप प्रदेश किसान सभेचे सरचिटणीस दिलीपराव देशमुख, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे,पि.एस.आय.प्रभाकर अंधोरीकर, प्रा.बालाजी आचार्य,सुजीत गायकवाड, शिवानंद हेंगणे, शेषेराव ससाणे,श्रींकात बनसोडे, अंजली वाघंबर, डॉ सिद्धार्थकुमार सूर्यवंशी,जिवन गायकवाड,शाहिर साबळे इत्यादी मान्यवरांनी भगवान गौतम बुद्ध व सर्व महामानवाच्या कार्यावर आपले विचार मांडले.तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व तथागत महामानव गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट चे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे हे होते तर उद्घघाटक म्हणून आमदार बाबासाहेब पाटील, हे होते पंचशील ध्वजारोहन हस्ते भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाक्के यांच्या हस्ते करण्यात आले, स्वागताध्यक्ष प्रा.बालाजी आचार्य व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दिलीपराव देशमुख. डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, शाहीर साबळे, जि.प.सदस्य माधव जाधव, चन्द्रशेखर भालेराव, दयानंद पाटील, धर्मपाल गायकवाड, शिवानंद हेंगणे, बालाजी तुरेवाले, गौतम कांबळे, गौस बागवान, अशोक सोनकांबळे, शेषेराव ससाणे, मुन्नातांबोळी,एम.बी.वाघमारे,अभय मिरकले,दिगांबर गायकवाड, डॉ.संजय वाघंबर, मुन्ना कांबळे, वाल्मिकी कांबळे, धनंजय जाधव, पिराजी शिंदे,नवरंगे सर, श्रीमती शकुंतलाबाई बनसोडे, अतुल ससाने, शीला शिंदे,प्रभाताई तिगोटे, चंद्रभागा तिगोटे, चंचल ससाणे, दैवशाला वाघंबर, महानंदा दाभाडे, रमाबाई बनसोडे,शिल्पा गायकवाड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजक व संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर, शेख कलीम, डॉ. संजय वाघंबर, आदित्य वाघंबर, रितेश वाघंबर, शेख मुसा भाई, आकाश व्यवहारे, दिलीप ससाने इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिवन गायकवाड यांनी केले. तर आभार सौ. अंजली वाघंबर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमाला महीला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

About The Author