विद्यार्थी – पालक – शिक्षक सुसंवाद आवश्यक – अॅड.सुपोषपाणि आर्य
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थी- पालक- शिक्षक -मुख्याध्यापक- संस्थाध्यक्ष व संस्था पदाधिकारी यांचा पालक संवाद संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्था अध्यक्ष ऍड.सुपोषपाणि आर्य सर यांनी भूषवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या पालक संवादासाठी संस्था पदाधिकारी तसेच शालेय समिती सदस्य पंडित सुकणीकर निमंत्रित पालक, महिला, पुरुष,शिक्षक बंधू भगिणी उपस्थित होते.
या पालक संवाद प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुपोषपाणि आर्य सर तसेच पंडित सुकनिकर, मुख्याध्यापक आनंद चोबळे, प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण,प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये,पालक प्रतिनिधी बिरादार बाबुराव यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
पालक संवादामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तज्ञ मार्गदर्शक देबडवार संजय, प्रवीण भोळे ,धनश्री जाधव यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व अडचणी याविषयी पालक प्रतिनिधी रामबिलास नावंदर, फड पांडुरंग, ऍड. बाळासाहेब नवटक्के, स्मिता तिवारी ,मीनाक्षीताई, सतिष केंद्रे यांनी आपले विचार व्यक्त केले व शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जे प्रयत्न केले जात आहेत त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
शालेय समिती सदस्य व मार्गदर्शक पंडितजी सुकणीकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ घोकंपट्टी न करता विविध विषयाच्या संकल्पना, आशय समजून घ्यावा, प्रात्यक्षिक घटकांचा सराव अधिक व्हावा यासाठी विद्यार्थी- शिक्षक यांनी कृतिशील सहभाग नोंदवावा. पालक- शिक्षक- विद्यार्थी यांचे नाते अतूट, विश्वासाचे,मैत्रीचे, सहानुभूतीचे, सामंजस्याचे असावे, महिला पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीकडे व दैनंदिन वर्तणूक याकडे आवर्जून लक्ष द्यावे, चांगले काय वाईट काय याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करावे असे महत्वपूर्ण मार्गदर्शन पालक संवाद सभेमध्ये पंडितजी सुकणीकर यांनी केले केले.
अध्यक्षीय समारोप यामध्ये संस्थाध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य सर यांनी महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले विद्यार्थी -शिक्षक- पालक यांच्यामध्ये नेहमी सुसंवाद असावा, विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाच्या मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात, पायाभूत अभ्यास करावा, परीक्षेतील गुणात्मक वाढीसाठी जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांनी सोडवाव्यात, सर्वांगीण प्रगतीचे ध्येय उराशी बाळगून विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वाटचाल करावी त्यास पालक शिक्षक यांनी नेहमी साथ द्यावी, बौद्धिक विकासाबरोबरच विविध कलागुण, शारीरिक कौशल्य, खेळ, व्यायाम प्राणायाम याकडे विद्यार्थी व पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे यासंबंधी महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन ऍड सुपोषपाणि आर्य सर यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण कांबळे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व विद्यार्थी प्रगती संबंधी मनोगत मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी व्यक्त केले, प्रभारी पर्यवेक्षक राहुल लिमये यांनी सर्व उपस्थितांचे, मान्यवरांचे, पालकांचे आभार व्यक्त केले. पालक संवाद सभा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.