तुमच्या आशिर्वादानेच उदगीर मतदार संघाची छाप संपूर्ण महाराष्ट्रात : आमदार संजय बनसोडे
उदगीर (एल.पी.उगीले) : मतदार संघात आजपर्यंत आपण
१३२ रस्त्याला मंजुरी दिली असुन त्यातील बरेच रस्ते पूर्ण झाले आहेत. उदगीर व जळकोट शहरात विविध विकास कामे प्रगतीपथावर चालु आहेत. आपल्या मतदार संघाचा सर्वांगीण विकास हा एकच ध्यास घेवुन मी काम करत असुन केवळ तुमच्या आशिर्वादानेच उदगीर मतदार संघाची छाप संपूर्ण महाराष्ट्रात असल्याचे प्रतिपादन
उदगीर मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी केले.
ते उदगीर शहरातील महेश काॅलनीतील मनरेगा योजना अंतर्गत बांधकाम झालेल्या सिमेंट रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी सांगितले की, आपल्या महेश काॅलनीतील महिलांची प्राधान्याने मागणी होती की आमच्या रहदारीचा रस्ता कच्चा असुन पावसाळ्यात या रस्त्याने चालतानाही खुप त्रास होत आहे. त्यामुळे आम्हाला सिमेंटचा रस्ता मंजूर करुन द्यावा, अधी आग्रही मागणी होती. म्हणून मी प्राधान्याने आपला विचार केला.
आपल्या सर्व मागण्यांसाठी मी प्रयत्न केले व पुढे ही करणार असुन आपल्या मारवाडी समाजाच्या स्मशानभुमीचा प्रश्न ही मी सोडवला असुन त्याच्या संरक्षण भिंत व शेडचे काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करु असे सांगितले.
आपली महेश काॅलनी ही सोमनाथपुरच्या ग्राम पंचायत अंतर्गत येत असुन लवकरच येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असुन पाणीपुरवठा योजनेसाठी १४ कोटी रूपयाची पाणीपुरवठा योजना आणली त्याचे काम सुरु आहे. यापुढे ही मी तुमच्या सोबत असुन मी तुमच्यापाठीमागे खंबीर उभा आहे.
मतदार संघात आपण जवळपास १७०० कोटी रुपयाचा निधी आणला. भविष्यात मतदार संघात दर्जेदार रस्ते निर्माण होणार आहेत. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोमनाथपुर येथे ए. सी. हाॅस्पिटलची उभारणी चालु आहे. त्याचेही काम लवकरच पूर्ण होईल असे सांगितले.
यावेळी डाॅ.रामप्रसाद लखोटिया, सोमनाथपुरचे सरपंच राम सुर्यवंशी, गुडसुरचे सरपंच बालाजी देमगुंडे, देविदास कांबळे , विदेश पाटील, विजयकुमार चवळे, जितेंद्र शिंदे, वैजनाथ तोंडारे, किशन चव्हाण, राजेश कदम, शामसुंदर मालानी,अशोक बाहेती, मोमीन अकबर, अमित माडे, वंदराज देवासे, मारुती पवार, विनोद टवानी, ईश्वरप्रसाद बाहेती, लक्ष्मीनारायण लोया, राजेश पारिक, राजगोपाल राठी, बाबूलालजी कालानी, संजय नावंदर, द्वारकादास भुतडा, मदनलाल परिहार, बालाप्रसाद गिल्डा, कचरूलाल मुंदडा, रतिकांत घोगरे, श्रीपती जाधव, उमाकांत तोंडारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राजु सोनी यांनी केले. यावेळी मारवाडी समाजातील महिला, पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.