नेहरू युवा केंद्र आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी
हावगीस्वामीच्या दोन विद्यार्थ्यांची निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार मार्फत युवा उत्सव अंतर्गत नेहरू युवा केंद्र लातूरच्या वतीने शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी तालुका पातळीवर स्पर्धा घेऊन निवड करण्यात आली. दि.१४ ऑक्टोबर २०२२ रोजी राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील मृदुला विश्वनाथ कुलकर्णी एम.कॉम. व संगमेश्वर गणेश दावणे बी.ए.या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली. मृदुला कुलकर्णी यांनी विकसित भारत का लक्ष या विषयावर हिंदीमध्ये भाषण करून प्रथम क्रमांक मिळविले. तर संगमेश्वर धावणे यांनी फोटोग्राफी मध्ये यश प्राप्त केले. उदगीर येथे झालेल्या स्पर्धेत महाविद्यालयातील साक्षी शरद डोंगरे व स्नेहा रामशेट्टी ददापुरे यांनी पण युवा लेखक व युवा पेंटिंग मध्ये सहभाग नोंदविलेला होता.
महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची लातूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे,सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे,प्र. प्राचार्य डॉ.एस.एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ.ए.ए. काळगापुरे, वक्तृत्व व वादविवाद मंडळ समितीतील डॉ.म.ई. तंगावार, प्रा.वसंत पवार, डॉ.दत्ताहरी होनराव, प्रा.धनराज बंडे, प्रा.जे.डी.संपाळे, प्रा.एन.आर. हाके,प्रा.मनोहर भालके तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.