5 जी सिम अपडेट च्या लिंक वर क्लिक करू नका, फसवणुकीची शक्यता !

5 जी सिम अपडेट च्या लिंक वर क्लिक करू नका, फसवणुकीची शक्यता !

उदगीर (एल.पी.उगीले) : सध्या सामान्य माणसाला लुबाडण्याचा नवीन धंदा ऑनलाइन पद्धतीने फसवून आर्थिक गोची करण्याचा प्रयत्न अनेक जण करत आहेत. ऑनलाईन पद्धतीमध्ये धोका देऊन काही लोक तुमच्या मोबाईल सिमला 5 जी करतो म्हणून एक लिंक पाठवत आहेत. सदरील लिंक ओपन केल्यानंतर आपल्याला ओटीपी नंबर येतो, सदरील ओटीपी नंबर सांगण्यासंदर्भात सूचना केल्या जातात.
आपला फोर जी चा मोबाईल फाईव्ह जी मध्ये बदलण्यासाठी आपण तो ओटीपी नंबर त्या व्यक्तीला सांगतो, आणि या ठिकाणीच आपली फसगत होते. त्यामुळे कोणत्याही अनोळखी व्यक्तीने अशा संदर्भामध्ये पाठवलेल्या कोणत्याही लिंकला क्लिक करू नका. आणि आपली फसवणूक करून घेऊ नका. अशा पद्धतीच्या सूचना सायबर ब्रांच च्या वतीने दिल्या जात आहेत.
सद्यस्थितीत फक्त महानगरामध्ये फाईव्ह जी ही मोबाईल सेवा सुरू करण्यात आली आहे. सामान्य शहरांमध्ये अद्यापही सुविधा आलेली नाही, मात्र काही आकर्षक जाहिरातीला बळी पडून आपले सिम कार्ड 5g मध्ये अपग्रेड करण्यासाठी लिंक पाठवून फसवणूक करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आपल्याला 5g वापरायचा असेल तर मोबाईल अपडेट करायचा आहे, सिम कार्ड नाही. त्यामुळे अशा फसव्या जाहिरातीला कोणीही बळी पडू नये. अशा पद्धतीचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आपण संबंधित कंपनीशी संपर्क करून या संदर्भात अधिक माहिती घेऊ शकता, मात्र इतर कोणत्याही अनोळखी लिंक ओपन करू नयेत. अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.

About The Author