इतिहास विभागाच्या वतीने डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील इतिहास विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर संशोधक, महान शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती, ‘ मिसाईल मॅन’, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची ९१ वी जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी भूषविले. याप्रसंगी प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.मुंढे यांनी डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्रावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सविस्तर भाष्य केले. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून इतिहास विभागाच्या वतीने आज आभासी पध्दतीने अंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे ही आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख संयोजक डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले.यावेळी क्रीडा विभाग प्रमुख डॉ. अभिजीत मोरे, डॉ. सचिन गर्जे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, शिवाजी चोपडे, वामनराव मलकापुरे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह प्राध्यापक , कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.