येलम मित्र संस्थेच्या वतीने लक्ष्मण रेड्डी यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील एक उमदे नेतृत्व आणि समाजसेवेची जाण असलेले युवक लक्ष्मण कलमुकले रेड्डी तोंडचिरकर यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, येलम मित्र संस्थेच्या वतीने समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.
येलम मित्र संस्था ही प्रत्येक वर्षी समाजामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला प्रोत्साहन देण्यासाठी तथा त्यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श इतरांनी घ्यावा. यासाठी मेळाव्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते समाज भूषण हा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावर्षीचा पुरस्कार हा लक्ष्मण रेड्डी तोंडचिरकर यांना देण्यात आला.
राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ते कार्य करत असले तरी, त्यांच्या राजकीय कार्यक्षेत्रापेक्षा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक या क्षेत्रात त्यांनी केलेल्या अनेक वर्षापासूनच्या कामाचा दाखला म्हणून सदरील पुरस्कार देण्यात आला आहे.
यापूर्वी देखील सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शासनाच्या अण्णाभाऊ साठे पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार दोन लाख रुपये नगदी आणि स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असा होता. या पुरस्कारासाठी देण्यात आलेली रक्कम लक्ष्मण रेड्डी यांनी समाज कार्य करणाऱ्या संस्थांसाठी दान केली. तसेच त्यांना सप्तरंग प्रतिष्ठान अहमदनगरचा युवा सामाजिक सेवा पुरस्कार देखील देण्यात आला होता. शेतकरी पुत्र फाउंडेशनचा नॅशनल ग्रेट अवॉर्ड 2022 हा पुरस्कार देखील जाहीर करण्यात आला आहे.
राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त प्रोत्साहन आणि उत्साह दाखवून काम करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाची दखल सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांना आणखी काम करण्याची प्रेरणा द्यावी, यासाठी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
लक्ष्मण रेड्डी तोंडचिरकर यांची निवड ही अत्यंत योग्य, आणि कर्तबगार व्यक्तीला पुरस्कार दिला गेला. अशा शब्दात अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.