अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाला योगा वर्गाची मान्यता

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाला योगा वर्गाची मान्यता

अहमदपूर (एल.पी.उगीले) : येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर संचालित अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात योग शिक्षक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकची मान्यता नुकतीच मिळाली असून, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून योगशिक्षक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य तथा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्राचे केंद्र प्रमुख वसंत बिरादार पाटील यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की दिवसेंदिवस बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक शारीरिक व्याधी, तसेच मानसिक दृष्ट्या खचून जाण्याच्या प्रवृत्ती दिसून येत आहेत. या दृष्टीने सर्व क्षमतेसाठी उत्तम, निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी नैसर्गिक दृष्टीने योगाची गरज निर्माण झाली असून, लोकांना योगाचे महत्त्व पटत आहे.

या पार्श्वभूमीवर योग्य पद्धतीने आणि तंत्रशुद्ध योग शिक्षण देण्यासाठी योग शिक्षकाची आवश्यकता असते , हे लक्षात घेऊन येथील महात्मा फुले महाविद्यालयाने परिसरातील जनतेसाठी योगशिक्षक हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमास मर्यादित जागा असून लवकरात लवकर प्रवेश घेण्याचे आवाहन केंद्र प्रमुख प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व केंद्र संयोजक प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे, केंद्र सहाय्यक डॉ. संतोष पाटील यांनी केले आहे.

About The Author