व्हॉलीबॉलमुळे आपल्या गावाची नोंद देशपातळीवर : माजी गृहराज्यमंत्री आ. बनसोडे

व्हॉलीबॉलमुळे आपल्या गावाची नोंद देशपातळीवर : माजी गृहराज्यमंत्री आ. बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या चार दशकापासून उदगीर तालुक्यातील वाढवणा या गावात व्हॉलीबॉल च्या माध्यमातून अनेक खेळाडूंची निर्मिती झाली असून ज्याप्रमाणे पाण्यामध्ये माशाला पोहायला शिकवले जात नाही, त्याचप्रमाणे वाढवणा येथील मुलांना व्हॉलीबॉल कसा खेळावा? हे शिकवावे लागत नसून मागील काळात व्हॉलीबॉलमुळे आपल्या भागातील शेकडो विद्यार्थी व्हॉलीबॉल खेळुन प्रशिक्षित होऊन, राज्य व देश पातळीवर गेले.

या व्हॉलीबॉलमुळेच आपल्या गावाची नोंद देश पातळीवर गेली असल्याचे मत माजी गृहराज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. येथील यशवंत हॉलीबॉल क्लबच्या रोप्य महोत्सवानिमित्त भव्य पुरुष स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव , अहमदपूरचे आ. बाबासाहेब पाटील , लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, वाढवण्याचे सरपंच नागेश थोंटे, वाढवण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण, चेअरमन विश्वनाथ काळे, ज्येष्ठ खेळाडू जलील खाँ गोलंदाज, गणपतराव माने, अनंत परसेवार, यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद जाधव, माजी सरपंच दत्तात्रय बामणे, प्रा. श्याम डावळे, माधव कांबळे, उपसरपंच ज्ञानेश्वर क्षीरसागर, संजय पाटील, राजकुमार जोंधळे , पुरुषोत्तम भांगे, महेश पाळणे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी वाढवणा गाव आणि व्हॉलीबॉल यांचे एक अतूट नाते असून इथल्या अनेक खेळाडूंनी आपल्या गावचे नाव देशपातळीवर गाजवले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संघ असेल किंवा लातूर जिल्हा पोलीस दलाचा संघ असेल यांनी वाढवणा गावचे नाव उंचावले आहे. याचा आम्हाला अभिमान वाटतो. या व्हॉलीबॉलमुळे अनेक खेळाडू मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत, याचीही नोंद आपण सर्वांनी घेतली पाहिजे.

या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन प्रामुख्याने जलील हाळणे व शांतीलाल कोंडेकर यांनी केले असून त्यांना आजी-माजी सर्व खेळाडूंनी मदत करावी. व या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करून आपल्या भागाचा नावलौकिक वाढवावा. अशी अपेक्षा आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केली.

यावेळी संगम अष्टुरे, नागोराव आमगे, हनमंत केसगिरे, अनिल क्षीरसागर, बालाजी काळे, सुनील खिडसे, बालाजी बामणे, तुकाराम शिंदे , शिवबा पाटील, विवेक दापके, व्यंकट मुंडकर, अनिल भारती, भरत पुंड, अभिजीत औटे, दीपक बुरसे, गणेश साळुंखे, महेश खेळगे, विपुल दापके, ओमप्रकाश लोंढे, मनोज माने, मनोज तरवडे, बालाजी माटेकर , सुनील पुंड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदेश आमगे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र कांबळे यांनी केले. या व्हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author