ज्ञानोबा व्यंकटराव मुंढे यांना अर्थशास्त्र विषयात पी एच डी मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

ज्ञानोबा व्यंकटराव मुंढे यांना अर्थशास्त्र विषयात पी एच डी मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने सत्कार

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालयांच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एल. एच. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरशेळकी गावचे सुपुत्र, आणि गट साधन केंद्र उदगीर येथील तालुका बालरक्षक पदाची धुरा सांभाळणारे, शिक्षक प्रशिक्षणात उत्साहाने सहभागी असणारे उच्च विद्याविभूषित विषय साधनव्यक्ती सुप्रसिद्ध वक्ते,उत्कृष्ट सूत्रसंचालक, ज्ञानोबा व्यंकटराव मुंढे यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे “कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेती व शेतकऱ्यांच्या विकासातील योगदान-उदगीर व मुखेड तालुक्याचा तुलनात्मक अभ्यास” या विषयावर शोधप्रबंध सादर केला.विद्यापीठाच्या वतीने पी एच डी ची मौखिक परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न झाली,आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या वतीने ज्ञानोबा व्यंकटराव मुंढे यांना अर्थशास्त्र विषयात पी एच डी प्रदान करण्यात आली.त्यांच्या या यशाबद्दल मार्गदर्शक प्रा.डॉ एल एच पाटील यांनी संशोधक ज्ञानोबा मुंढे यांचेअभिनंदन केले,आणि त्याचबरोबर डोंगरशेळकी येथील गावकऱ्यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला,व गावचे माजी सरपंच मारोती मुंढे,ज्ञानोबा मुंढे,चेअरमन हणमंत मुंढे,मुरहारी मुंढे,ज्ञानोबा पुंड,बालाजी गुरमे,बाबुराव मुंढे,एस पी मुंढे,जि टी मुंढे,मनोज मुंढे,डॉ श्रीकांत मुंढे,बी एन मुंढे,हणमंत शेळके,बालाजी बरुरे,डॉ विष्णूकांत मुंढे,व्ही. पी. गुरमे,व्यंकटराव मुंढे,नरशिंग मुंढे,सी. पी. मुंढे,ज्ञानोबा मुंढे,गणेश मुंढे,गंगाधर सुर्यवंशी,शिवाजी शिंदे,सत्यवान मुंढे, मारोती केंद्रे,संजीव मुंढे,दत्ता मुंढे,तातेराव मुंढे,तुकाराम मुंढे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

About The Author