रंगकर्मीच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन
जानेवारी २०२३ला होणार वितरण
उदगीर (एल.पी.उगीले) : येथिल रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ व भरीव कार्यकरणार्या व्यक्तींना दिल्या जाणार्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी केले आहे.
रंगकर्मी प्रतिष्ठान उदगीरच्या वतीने सामाजिक ,शैक्षणिक ,कृषीविषयक ,आरोग्य पर्यावरण ,सांस्कृतीक ,साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणार्या व्यक्ती व संस्थांना राज्यस्तरीय पुरस्काराने मागील सात वर्षा पासुन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाते.
रंगकर्मी साहित्य, कला ,क्रीडा प्रतिष्ठान राष्ट्रीय स्तरावरील लघुपट महोत्सव , आरोग्य शिबीर , पत्रकारिता पुरस्कार पथनाटयातून विविध विषयावर जनजागृती , महापुरुषांच्या विचारावरील वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन , विज्ञान प्रदर्शन,क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते. मानपत्र ,गौरवचिन्ह पुरस्काराचे स्वरुप असुन पुरस्कारासाठी सामाजिक, शैक्षणिक ,साहित्य ,कला, आरोग्य,पर्यावरण , क्षेत्रातील उत्कृष्ट व भरीव कार्य करणार्या व्यक्ती व संस्थांनी जानेवारी २०२३ च्या पुरस्कारासाठीचे प्रस्ताव दि . १५ डिसेंबर २०२२ पर्यंत पोहचतील या पद्घतीने पाठवावे , पुरस्कार वितरण जानेवारी २०२३ ला होणार आहे .प्रस्ताव प्रा बिभीषण मद्देवाड ,लोकाक्षर कार्यालय, ग्रामीण पोलीस स्टेशन समोर नांदेड रोड उदगीर जि लातूर मो (9823160552 )या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन , रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड , अॅड विष्णू लांडगे ,अॅड महेश मळगे ,रसुल दा पठान, रामदास केदार लक्ष्मण बेंबडे ,मारोती भोसले , महादेव खळूरे , संदीप मद्दे , सिद्घार्थ सुर्यवंशी , लक्ष्मण बेंबडे , सचीन शिवशेट्टे , प्रल्हाद येवरीकर,,जहाँगीर पटेल , निता मोरे ,विवेक होळसंबरे टी. डी. पांचाळ ,अश्विनी निवर्गी बालाजी भोसले , अर्चना पाटील ,मोहसिन शेख, नारायण कुंडले ,मारोती वाघमारे ,गजानन देवकत्ते , हणमंत केंद्रे आदीनी केले आहे.