शासकीय अध्यापक विद्यालय येथे विधी साक्षरता शिबिर व रक्तदान शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) : संविधान दिना निमित्त शासकीय अध्यापक विद्यालय उदगीर येथे विधी साक्षरता शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोरे व प्रमुख पाहुणे म्हणून डी पी सातवळेकर (जिल्हा न्यायाधीश),आर बी गिरी (दिवाणी नायायधिश),एम के मळगे (विधीज्ञ संघ उदगीर),पाटील जी एम (तालुका विधी समिती समन्वयक)हे उपस्थितीत होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी विदुर्थ्याना कायदेशीर बाबीचे सखोल मार्गदर्शन करत संविधान दिवस याची माहिती दिली.
या आयोजित रक्तदान शिबिरात सचिन शिवाजी बोकन,अजित आत्माराम लिंबकर,सौ. पाटील अनिता चंद्रहर्ष,राजेश वैजनाथ गोरे,गोविंद पंढरीनाथ भोळे,कुमारी वल्लपवाड लक्ष्मी विश्वनाथ,कुमारी बिरादार वैष्णवी बाबुराव, परगे स्वप्निल संजय,धनाडे अथर्व मल्लिकार्जुन,देशमुख जुनेद आबेद अली,चव्हाण प्रदीप वामन,वैष्णव विठ्ठलराव मुळे,कानवटे ओंकार पुंडलिकराव,मुंडे ऋषिकेश गोविंद,अजय अशोक माडजे,घोनसे अभिषेक भानुदास यांनी रक्तदान केले.या वेळी नागप्पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीरच्या वतीने डॉ संग्राम पटवारी यांनी रक्तदान करण्याचे फायदे व महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा मुंढे व श्रद्धा गट्टेवार यांनी तर आभार पवन पाटील या छात्राध्यापकांनी केले.
रक्तदान शिबिरासाठी ब्लड बँकेचे पी आर ओ ओमकार गांजुरे,अविनाश बिरादार,सपना कांबळे,संगम स्वामी यांची उपस्थिती होती.