भारतीय संविधानामुळे समाजातील उपेक्षित,मागास वदुर्बल घटकांना न्याय मिळाला – प्रा.डॉ.दत्ताहरी होनराव

भारतीय संविधानामुळे समाजातील उपेक्षित,मागास वदुर्बल घटकांना न्याय मिळाला - प्रा.डॉ.दत्ताहरी होनराव

उदगीर (एल.पी.उगीले) : भारत देश कोण्या एका धर्माचा,पंथाचा,हुकूमशहाचा देश नाही. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य संविधानाने दिले.संविधानामुळेच समाजातील उपेक्षित,मागास व दुर्बलघटकांना न्याय मिळाला.असे भारतीय संविधानचे अभ्यासक प्रा.डॉ .दत्ताहरी होनराव म्हणाले. शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीर व जमहूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे प्राचार्य राजा पटेल बाखी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित संविधान दिन कार्यक्रमात बोलताना प्रा.होनराव पुढे म्हणाले संविधान म्हणजे समता व मानवतेची सनद आहे.संविधानाची ओळख झालेली माणसं हक्क व कर्तव्याबाबत जागृत असतात. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य राजा पटेल बाखी म्हणाले की, सर्व धर्म समभावना जोपासल्यमुळे सामाजिक ऐक्य बळकट होते. उर्दू भाषिक युवक, युवतीची मोठ्या संख्येने उपस्थिती असलेल्या‌ कार्यक्रमाच्या मंचावर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे गुरूजी, अंनिस चे अध्यक्ष बाबूराव माशाळकर, जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदास नादरगे, पांडुरंग बोडके, वैजनाथ पंचगल्ले इ.मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी संविधानचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरव भारतीय संविधानचे पूजन करण्यात आले.शेख फैजुनिसा यांनी मधूर प्रेरणा गीत सादर केल्यानंतर मंचावरील पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.बाबुराव माशाळकरांनी प्रास्ताविकात अंनिसची भूमिका मांडली. सय्यद खलील सर यानी सूत्र संचलन केले तर दायमी रहिम यानी उपस्थितांचे आभार मानले.

About The Author