सोमवंशी दाम्पत्याने सामाजिक जाणीवा जपल्या – विश्वनाथ मुडपे
दीपज्योती डोळ्याचा दवाखाना येथे नेत्र तपासणी शिबीर संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहरातच नव्हे तर पंचक्रोशी मध्ये विशेषतः सीमा वरती भागात आणि मराठवाड्यात नेत्ररोग तज्ञ डॉक्टर दीपाताई सोमवंशी यांच्या दीपज्योती नेत्र रुग्णालयाने नावलौकिक मिळवले रुग्णांची सेवा हीच ईश्वरांची सेवा या भावनेतून हे दाम्पत्य कार्य करत असल्याचे विचार राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक विश्वनाथराव मूडपे यांनी व्यक्त केले ते रुक्मीणी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व संशोधन केंद्र उदगीर द्वारा संचलित, दीपज्योती डोळ्याचा दवाखाना उदगीर येथे कै. रुक्मीणबाई संग्राम सोमवंशी यांच्या पुण्यतिथी निमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी नेत्र तपासणी व उपचार शिबीर घेण्यात आले.या शिबिराचे उदघाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
उदगीर शहर हे महाराष्ट्र कर्नाटका आंध्रा तेलंगणा या राज्यांच्या सीमेवर असल्यामुळे या भागातून मोठ्या प्रमाणात नेत्र रुग्ण उदगीर चे नावलौकिक ऐकून येतात यापैकी कित्येक मध्यमवर्गीय आणि गरीब असतात त्या सर्वांचीच सेवा आर्थिक फायद्यापेक्षा मानसिक समाधानासाठी करणारे हे दांपत्य खरोखर या क्षेत्रासाठी आदर्श आणि इतरांनी अनुकरण घ्यावे असे आहे असेही ज्येष्ठ नागरिक तथा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक श्री.विश्वनाथ मुडपे गुरुजी यांनी सांगितले.
यावेळी जिव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदास नादरगे, पांडुरंग बोडके, सोपानराव माने तसेच विद्यासागर डोरनाळीकर, अविनाश गायकवाड, डॉ. दीपक सोमवंशी, डॉ.ज्योती दीपक सोमवंशी, बालाजी टाळीकोटे, गिरीधर गायकवाड, राजीव किणीकर, शंकर बोईनवाड यांची उपस्थिती होती.
प्रारंभी कै. रुक्मीणबाई संग्राम सोमवंशी यांचे प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे उदघाटक श्री.विश्वनाथ मुडपे यांनी आपले विचार व्यक्त केले. एका सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन आपल्या हस्ते होत असल्याबद्दल विश्वनाथ मुडपे यांनी समाधान व्यक्त केले तसेच “डॉ. ज्योती सोमवंशी” यांचे नेत्र शस्त्रक्रियेतील कार्य उल्लेखनीय असे आहे. वैद्यकीय सेवा सांभाळत त्यांनी केलेले सामाजिक कार्यही महत्वाचे आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श इतर महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले “.या शिबिरात उदगीर, देवणी, जळकोट, चाकूर, अहमदपूर, निलंगा, कमालनगर,औराद सह नांदेड जिल्ह्यातील मुखेड, देगलूर तालुक्यातील जवळपास १५० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरीकांनी लाभ उचलला, याप्रसंगी अनेक श्रेष्ठ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर अनेकांवर अल्पदरात शस्त्रक्रिया करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.