ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक करीता मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण उत्‍साहात

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक करीता मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण उत्‍साहात

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुक २०२२ अंतर्गत प्रथम प्रशिक्षण भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय कोळखेड रोड उदगीर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रामध्ये सकाळी ११.00 ते 2.00 दरम्‍यान पीपीटी द्वारे मतदान प्रक्रियेबद्दल नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांचे मार्फत व राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

एकूण १५९ मतदान केंद्राध्यक्ष, १५६ मतदान अधिकारी-1, 153 मतदान अधिकारी-2 व 161 मतदान अधिकारी-3 असे एकूण 629 कर्मचारी मतदान प्रक्रिया करता नियुक्त करण्यात आलेले होते. त्यापैकी 55 प्रशिक्षणार्थी गैरहजर असल्याचे दिसून आले.

दुसऱ्या सत्रामध्ये लालबहादूर माध्यमिक विद्यालय उदगीर येथे दुपारी दोन ते पाच दरम्यान मतदान यंत्र हाताळणीचे प्रत्यक्ष हँडसम प्रशिक्षण मास्टर ट्रेनर व सहाय्यक मास्टर ट्रेनर यांच्यामार्फत देण्यात आले.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२२ करिता नियुक्‍त केलेले जे अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षणास वैध कारणाशिवाय गैरहजेर आहेत, व जे निवडणुकांच्‍या संबंधातील अधिकृत कर्तव्‍यात भंग करतील त्‍यांच्‍या विरुध्‍द महाराष्‍ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम २३ नुसार कार्यवाही करण्‍यात येईल. असे राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी प्रतिपादन केले.

About The Author