शिवाजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा

शिवाजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त संविधानाप्रती विनम्र अभिवाद व उद्देशिकेचे प्रकटवाचन करण्यात आले. कार्यक्रमाला किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ज्ञानदेव झोडगे, कौषाध्यक्ष चामले नामदेव, कार्यकारणी सदस्य माधवराव पाटील, पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनायक जाधव, उपप्राचार्य डॉ. एस. व्ही जगताप, उपप्राचार्य डॉ. आर. एम. मांजरे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विलास भोसले, पर्यवेक्षक प्रा. जी. जी. सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. एस एम कोनाळे यांनी तर आभार प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!