डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जगात सर्वश्रेष्ठ – मा.मंत्री बाळासाहेब जाधव
अहमदपूर ( गोविंद काळे ) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित ” 26 नोव्हेंबर संविधान गौरव दिन ” कार्यक्रमानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रिपाई नेते बाबासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली भारताचे संविधान यांच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. आणि पंचशील त्रिशरण घेण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घघाटक माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव हे आपल्या भाषणात म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना ही अथक परिश्रम घेऊन तीन राष्ट्राचा अभ्यास करून हे संविधान लिहून काढली. हे संविधान सर्व जगात सर्वश्रेष्ठ असून या संविधानाची कोणीही बरोबरी करू शकत नाही. या संविधानामुळे सर्वसामान्य जनतेला व मोठ्यातल्या मोठ्या पुढारी राजकीय नेत्याला आणि सामान्य जनतेला एकच मतदानाचा हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. या संविधानामुळे या देशात, जगात शांतता पंचशील आणि गौतम बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञानाचा प्रसार, झाला असून त्यामध्ये शांतीचा मार्ग सांगण्यात आलेला आहे पण काही राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे या संविधानाचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत ते आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानात सर्व जाती धर्मांना समान न्याय देण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केलेले आहे. त्यामुळे आपण या संविधानाचा आदर करून त्याचे संरक्षण करण्याची जिम्मेदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे किंवा उचलली पाहिजे त्यामुळे या संविधानाचे पावित्र्य अबाधित राहील असे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव आपल्या उद्घघाटकपर भाषणात म्हणाले.यावेळी बाबासाहेब कांबळे, शेषेराव ससाणे,एम.बी.वाघमारे, मनोहर गायकवाड, इत्यादी मान्यवरांनी आपले विचार भाषणातून मांडले.
यावेळी प्रास्ताविक कार्यक्रमाचे निमंत्रक अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी आपले विचार भाषणातून व्यक्त केले.
तत्पूर्वी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. व सर्वांनी यावेळी संविधानाच्या प्रतीचे, उद्देशिकेचे वाचन सामूहिकरीत्या करण्यात आले व त्रिशरण पंचशील शेषराव ससाने यांनी घेतली या वेळी उपस्थित. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रिपाई नेते बाबासाहेब कांबळे हे होते तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव हे होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.टी.एन. कांबळे, कांबळे सर, सुप्रिया बनसोडे, सय्यद तौफिक, बजरंग गायकवाड, सचिन वाघमारे, सचिन बानाटे, वाय डी वाघमारे सर, दिलीप ससाणे, मुसा भाई तांबोळी, विशाल ससाने, पत्रकार भीमराव कांबळे, त्रिशरण वाघमारे, अहमद भाई तांबोळी, शेख नाझीम मिथुन, जीवन गायकवाड, सोनकांबळे, जगू वाघमारे, क्षीरसागर सर, शंकर कदम, सचिन गायकवाड, बाबू शेख, भाऊसाहेब कांबळे, भगवान कांबळे, सुनील डावरे, सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या मंडळाच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलीम अहमद यांनी केले. तर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्याचे आभार मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष मनोहर गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.