कौटुंबिक संस्काराचे खरे विद्यापीठ म्हणजे आजी आजोबा – ह.भ.प. कैलास महाराज मद्दे

कौटुंबिक संस्काराचे खरे विद्यापीठ म्हणजे आजी आजोबा - ह.भ.प. कैलास महाराज मद्दे

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कूल शाळेमध्ये आज दि 11 फेब्रुवारी रोजी आजी आजोबा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भागवताचार्य ह.भ.प. कैलास महाराज मद्दे तर व्यासपीठावर जेष्ठ विधिज्ञ ॲड. विठ्ठलराव भोसले, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ विळेगावे, शाळेचे प्राचार्य संतोष पाटील उपस्थित होते. सध्या कलियुगात आजी आजोबांचे कुटुंबातील स्थान काही प्रमाणात कमी झालेले दिसत आहे परंतु आपल्या कुटुंबामध्ये लहान मुलांवर खरे संस्कार जर कोण करत असेल तर ते म्हणजे आजी आजोबा म्हणून प्रत्येक घरामध्ये आजी आजोबा असलेच पाहिजेत असे मत ह भ प कैलास महाराज मद्दे यांनी आजी आजोबा मेळावा कार्यक्रमात बोलताना सांगितले. प्रत्येक शाळेमध्ये पालक मेळावे होतात परंतु कधीही शाळेत न येणारे म्हणजे आजी आजोबा असतात म्हणून या मेळाव्याच्या निमित्ताने का होईना ते शाळेत येतील म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमात आलेल्या सर्व आजी-आजोबांचे निरनिराळे आनंदी खेळ घेण्यात आले.कार्यक्रमात सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी आपल्या आजी आजोबा यांच्यावर कवितेतुन व भाषणातुन आपले प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ रमा गुडसुरकर यांनी केले सूत्रसंचालन सौ वैशाली वनवे व सौ सुंदर गुट्टे यांनी केले तर आभार किलबिल स्मार्टस् किड्स इनचार्ज किमि केपजिन यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व स्टाफनी मेहनत घेतली. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर आजी आजोबा यांची उपस्थिती होती.

About The Author