यशस्वी विद्यार्थिनींचा ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा अकॅडमी मध्ये सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : “स्पर्श” द एम्फटिक टच सेवाभावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा अकॅडमी, अहमदपूर येथे ज्योती गवते व ज्ञानेश्वरी भोरगिर या दोघी नागपूर येथे 9 महिन्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण करून आल्याबद्दल त्यांचा अकॅडमी च्य वतीने पलकासहित यथोचित सत्कार करून शुभेच्या देण्यात आल्या. ज्योति आपल्या मनोगतात म्हणाली की मी प्रवेश घेतला तेव्हा मला काहीच येत नव्हते , मला राहू वाटत नव्हते पण इप्पर सरांच्या मार्गदर्शनामुळे व सकारात्मक विचारा मुळे माझ्यात बदल झाले. वडिलांचे स्वप्न होते की काही तरी करावे आणि ते मी मेहनत करून स्वप्न पूर्ण केले. आता माझी बहिण पण येथे आहे. ती पण नक्कीच यशस्वी होईल. येवढे कमी पैशामध्ये आणि विशेष म्हणजे मुलीसाठी सुरक्षा देणारी अकॅडमी म्हणजे ज्ञानदीप अकॅडमी. ज्ञानेश्वरी म्हणली की माझी खूप गरीब परिस्तिथी आहे. मी पूर्ण दोन वर्ष राहिले मध्येच लोकडाऊन पडले तरी पण घरी थोडी तयारी केली . अडमिशिन संपल्यावर पण इप्पर सरांनी मला मदत केली, सर्व स्टाफ ने खूप चांगले शिकवले. म्हणून मि आज ड्रेस वर आहे. ज्ञानदीप अकॅडमी चे धन्यवाद. खरंच एवढी गोर गरीब विद्यार्थ्यांना समजून घेणारी अकॅडमी म्हणजे ज्ञानदीप अकॅडमी संचालक सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अखंडीत प्रयत्न करत राहीले की यश मिळत. धरसोड धरसोड केले की अपयश येते. आपण आपल्या निर्णयावर ठाम राहा नक्कीच यश मिळत. तुम्ही दोघी पण मेहनती आहेत अशीच मेहनत चालू ठेवा तुम्ही नक्कीच अधिकारी व्हाल अशी आशा व्यक्त केली. सुत्रसंचलन अकॅडमी चे प्रशासकीय अधिकारी नितीन गुट्टे यांनी केले तर आभार अर्चना मॅडम यांनी मांडले. राम मेजर, बालाजी नगरगोजे, जितेंद्र मेजर, ऋतुजा बनकर, संदीप नरोटे, निखिल कोळी, पालक, विद्यार्थी व विधर्थिनी उपस्थित होते.