मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 59 वा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील तीपन्ना नगर, फुले नगर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 59 वा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवुन करण्यात आला या विषयी सविस्तर माहीती अशी की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 59 वा वाढदिवस बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) अहमदपूर तालुका यांच्या वतीने विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवुन करण्यात आला यात शहरातील तिपन्ना नगर येथे लातुर जिल्हा प्रमुख ग्रामीण गोपाळ माने, उप जिल्हाप्रमुख गणेश पांचाळ,तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये, शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले, युवासेना तालुकाप्रमुख संगम पाटील या सर्वाच्या हस्ते तिपन्ना नगर येथील माता भगिनींना साडी – चोळी वाटप तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले, त्याचबरोबर महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी तंज्ञ प्रशिक्षक सौ.रेखाताई पांचाळ यांच्या संयुक्त विद्यमाने फुलेनगर येथील आय्या कॉम्प्लेक्स मधील आस्था सौदर्य पार्लर येथे सात दिवसीय बेसिक व अँडव्हास सौदर्य प्रशिक्षण शिबीरांची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी लातुर ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाळ माने यांनी कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रगतशील होण्यासाठी व्यवसायात उतरावा,यासाठी विविध व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन त्यांचा अधिक अधिक अनुभवातुन फायदा घेऊन व्यवसायाकडे वाटचाल करावी, तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षा मार्फत गरजु रुग्णांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळावी म्हणून शहरात नागरीकांना मदत करण्याचे आश्वासन दिले, त्याचप्रमाणे सरकारी विविध योजना शहरात राबवण्यासाठी प्रयत्नशिस राहिन असे अभिवचन यावेळी सर्वांना दिले याप्रसंगीकामगार सेना जिल्हाप्रमुख किरण गायकवाड, तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये, चाकुर तालुका प्रमुख रवी शिरूरे, युवासेना तालुका प्रमुख संगम पाटील,शहर प्रमुख लक्ष्मण अलगुले, उपशहर प्रमुख राजकुमार जाधव(पश्चिम), उपशहरप्रमुख राहुल गलाले (पुर्व),नरेश चौथईवाले,सुनील देशमुख, लक्किसिंग बावरी, प्रवीण डांगे, रोहन जाधव, अर्जन लिंबाळे,अमोल गोरे, अनिल चव्हाण, ऋषभ पाटील, योगेश स्वामी, ब्रम्हा सारोळे, कपिल नाकसाखरे, राम गायकवाड, तानाजी भगत, अक्षय कदम, हेंमत शिंदे, आदि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. सुत्रसंचलन सुनील देशमुख यांनी केले यावेळी मोठ्या संख्येने महिला व शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता.