विज्ञान प्रदर्शनात लालबहादुरच्या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

विज्ञान प्रदर्शनात लालबहादुरच्या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये लाल बहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला असून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यालयाची निवड झाली आहे.

या प्रदर्शनासाठी निवड झालेल्या प्रयोगाचे नाव होम युटीलिटी असे आहे. प्रयोग सादरीकरणात वायचळे गजानन,उदय गुडले, बिबीनवरे अभिजीत , मठपती ओमकार या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या यशस्वी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका सविता कोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

लातूर येथील श्री.श्री.रविशंकर विद्यालयात आयोजित केलेल्या या विज्ञान प्रदर्शनातील बक्षिसवितरण कार्यक्रमात प्रमुख आतिथीस्थानी सुप्रसिद्ध वक्ते डॉ. विठ्ठल लहाने ,शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी डॉ. नागेश मापारी,अधिव्याख्याता डॉ. भगीरथी गिरी,उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख, सचिव बी.जी. चोल, राजेंद्र चोले इ.मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलूरकर ,उपाध्यक्ष जितेशजी चापशी ,कार्यवाह डॉ.हेमंत वैद्य ,संकुलाचे अध्यक्ष मधूकरराव वट्टमवार , कार्यवाह तथा केंद्रीय कार्यकारी समिती सदस्य शंकरराव लासूणे ,शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड, उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी ,पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर,लालासाहेब गुळभिले, माधव मठवाले यांनी कौतुक केले, व पुढील प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author