लोहारे गुरुजींचं शैक्षणिक कार्य सर्वांसाठी दिशादर्शक – आ.बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी यांनी गेली साठ वर्ष अहमदपूर तालुक्यात केलेलं शैक्षणिक कार्य म्हणजे सर्वांसाठी एक दिशादर्शक, प्रेरणादायी असून अहमदपूरच्या शैक्षणिक नावलौकित गुरुजींचा फार मोलाचा वाटा आहे असे प्रतिपादन डी.बी.लोहारे गुरुजी यांच्या 89 व्या वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रमात बोलताना आमदार बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
वाढदिवस अभिष्टचिंतन कार्यक्रमासाठी यावेळी माझी मंत्री बाळासाहेब जाधव, टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ अशोक सांगवीकर, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सांब तात्या महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद तात्या हेंगणे अँड.भगवानराव पौळ, अँड.भारत भूषण क्षीरसागर,भारत दादा रेड्डी, पुष्पाताई लोहारे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, अभियंताअनिल मुळे, डॉ.सुनीताताई चवळे,इंजि उत्तमराव बिराजदार उपस्थित होते. यावेळी लोहारे गुरुजीं व पुष्पाताई लोहारे यांचा भर आहेर देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले गुरुजींना कसलाही शैक्षणिक किंवा राजकीय वारसा नसताना केवळ ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे या हेतूने स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कृपा आशीर्वादाने खेड्यापाड्यात शाळा सुरू करून शिक्षणाचा पाझर गाव खेड्यापर्यंत पोहोचवला, पुढे राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांसारख्या तपस्वी महापुरुषांचे अध्यात्मिक अधिष्ठान संस्थेला लाभले आणि आज महाराष्ट्रभर उल्लेख होत असलेल्या लातूर पॅटर्नचे खरे जनक लोहारे गुरुजी आहेत असे ते म्हणाले. यावेळी डॉक्टर अशोक सांगवीकर,अँड भगवानराव पौळ,भारत रेड्डी, डॉ.सुनिता चवळे, कोटलवार सर, कलावती भातांब्रे यांची भाषणे झाली.
सकाळपासून गुरुजींना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे दिलीपराव देशमुख, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी रेड्डी, डॉक्टर वैभव रेड्डी, डॉक्टर भालचंद्र पैके, डॉक्टर नील रोहित पैके, डॉक्टर मुसळे, सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, एड निखिल कासनाळे,ओम भाऊ पुणे, रवीदादा महाजन, अभय मिरकले, संदीप चौधरी, विनोद हेंगणे, ज्ञानोबा भोसले,रोटरी क्लब अध्यक्ष जीवन कापसे, सचिव कपिल बिरादार, सर्व सदस्य, पत्रकार संघाचे प्रा विश्वंभर स्वामी व सर्व सदस्य, राम बेल्लाळे माझी जि प अध्यक्ष घुमनवाड गुरुजी, चंद्रशेखर भालेराव, मारुती बुद्रुक पाटील, गणेश मुस्तापुरे, भारतीय जनता पार्टीचे गोविंद गिरी, केंद्रप्रमुख नंदकुमार कोनाळे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष कैलास क्षीरसागर, प्राचार्य रामलिंग मुळे, प्राचार्य व्ही व्ही गंपले, मुख्याध्यापक आर.सी. पाटील, दिलीप बनसोडे, गजानन शिंदे, चामे, सुनील जाधव, गिरीधर घोरबाड, राजेश्वर पारशेट्टे , सेवानिवृत्त प्राचार्य भरत शिरूरकर, बालाजी बिरादार, शिवमुर्ती भातंब्रे, प्रा हसबे सर, कोंडापूरे सर, ठेकेदार वाजिद शेख, यांच्यासह शहरातील डॉक्टर, प्रतिष्ठित व्यापारी, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, यांनी गुरुजींना उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कपिल बिरादार, सूत्रसंचालन प्रा. रविशंकर इरफळे यांनी तर आभार राजकुमार पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोमनाथ स्वामी, प्रा.शिवशंकर पाटील, दिलीप गुळवे, रमाकांत कोंडलवाडे, उमाकांत नरडेले, बालाजी सोनटक्के, सतीश बिरादार, श्रीधर लोहारे, लक्ष्मण फळ, विजय वाडकर, महादेव खळुरे, बालाजी माळी, बयास, संयोजन समितीतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
गुरुजींचे कार्य समर्पण भावनेचे
प्रतिकूल परिस्थितीत अनेक संकटावर मात करून गुरुजींनी राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज,कै.आमदार महालिंग आप्पा सांगवीकर यांचा आशीर्वादाने व सहकार्याने टागोर शिक्षण समितीची स्थापना करून गेली साठ वर्षापासून समर्पित भावनेने आपल्या संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी कार्य केले आहे . गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी आपल्या संस्थेत विविध उपक्रम राबवून, सर्व शिक्षकांना समानतेची वागणूक देवून प्रशासनात एकसुत्रि पणा ठेवून संस्थेचे वटवृक्षात रूपांतर करण्याच मोलाचं कार्य गुरुजींनी केले आहेत .त्याग आणि समर्पणाचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे लोहारे गुरुजी . गुरुजींना शताआयुष लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना– डॉ. अशोक सांगवीकर अध्यक्ष टागोर शिक्षण समिती अहमदपूर