आहार, विहार आणि विचार यातूनच मेंदूची कार्यक्षमता वाढते – आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे

आहार, विहार आणि विचार यातूनच मेंदूची कार्यक्षमता वाढते - आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे

अहमदपूर (गोविंद काळे) : प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याकडे विशेष काळजी देणे आवश्यक आहे, कारण कोरोना महामारी नंतर वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांचा सामना माणसांना करावा लागत आहे. यासाठी प्रतिकारशक्ती आणि बौद्धिक शक्ती वाढविणे आवश्यक आहे. म्हणूनच आहार, विचार आणि विहार यातूनच मेंदूची कार्यक्षमता वाढते,असे स्पष्ट प्रतिपादन प्रिस्टाइनचे सर्वेसर्वा व प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. प्रवीण बढे यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘प्रिस्टाइन आयुर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पुणे ‘ यांच्या साह्याने ‘शिवजयंती उत्सव – २०२३ ‘ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘मोफत आरोग्य तपासणी शिबिरा ‘ च्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे सचिव ज्ञानदेव झोडगे हे होते तर, विचार मंचावर किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे ज्येष्ठ संचालक माधवराव पाटील, माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील यांच्यासह प्रिस्टाइन आयुर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कार्यकारी संचालक डॉ. प्रवीण बडे व त्यांचे सहकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, महात्मा फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी. आर. काबरा, महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भागवत मुसने, यांच्याबरोबरच प्रिस्टाइन अयूर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ज्येष्ठ हेल्थ ॲडव्हायझर बापूसाहेब काळे, तानाजी माने, सचिन पवार, भूषण पंचवाडकर, राजेंद्र बळे, भगवान पाटील, इम्रान पठाण तसेच महाविद्यालयातील संयोजन समितीचे सदस्य प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना अनेक पुरस्कार प्राप्त असलेले डॉ. प्रवीण बढे म्हणाले की, शरीरामधील पाण्याची पातळी जर कमी झाली तर वेगवेगळे आजार उद्भवतात. म्हणून दिवसाकाठी किमान तीन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यक्तींनी आपल्या शारीरिक बदलाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. आज विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की, प्रत्येक आजारावर उपचार उपलब्ध आहेत. आयुर्वेद ही जगाला भारताकडून मिळालेली अति प्राचीन देणगी असून, आयुर्वेदावर विश्वास ठेवून आरोग्यपूर्ण जीवन जगणे प्रत्येक व्यक्तीच्या हातात आहे,असेही ते म्हणाले. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव म्हणाले की, महात्मा फुले महाविद्यालय नेहमीच सामाजिक, क्रीडा,सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवून अहमदपूर परिसरातील गोरगरीब जनतेची सेवा केली. निश्चितच प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील ज्ञानदानाबरोबरच आरोग्यदानाचे ही महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत, असेही गौरवोद्गार काढले.

या कार्यक्रमात मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले तर, सूत्रसंचालन डॉ. बब्रुवान मोरे यांनी तसेच आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी अहमदपूर तालुक्यातीलच नव्हे तर परभणी, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यातून ६१० हून अधिक व्यक्तींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

शिबीरात सत्यनारायण काळे, माजी नगरसेवक, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, जिल्हा भाजप उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, प्राचार्य डॉ. अनिता शिंदे, माजी उपसभापती जाभाडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद हेंगणे, परचंडाचे सरपंच शिवकुमार हिप्परगे, दक्षिण रूईचे सरपंच अशोक पाटील, शिवाजी देवकते, गणेश पांचाळ, मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड ॲड. दीपक कांबळे, माजी नगरसेवक शेषराव ससाणे यांच्यासह बहुसंख्य मान्यवर नागरिकांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

About The Author