माऊन्ट लिटेरा झी स्कुल मादलापुर, उदगीर या शाळेचे चौकशी करून कार्यवाही करण्याचे मा. उच्च न्यायालयाचे शिक्षण उपसंचालक लातुर यांना आदेश
देवणी (प्रतिनिधी) : उदगीर येथे चालु असलेले माऊन्ट लिटेरा झी स्कुल मध्ये बेकायदेशीर रित्या व सक्तीचे व दुप्पट रक्कमेने पुस्तके व गणवेश व स्टेशनरी विक्री करून विद्यार्थ्यांच्या पालकाचे आर्थिक लुट करत असल्यामुळे देवणी येथील अँड शिवानंद काशिनाथ मळभगे यांनी सदरील शाळेस बेकायदेशीर रित्या आकारणी करत असलेले फीस मध्ये कमी करण्याची विनंती केली मात्र संबंधित शाळेनी कोणतेही फिस कमी न करता पालकांना सक्तीचे बुकस गणवेश व स्टेशनरी खरेदी करण्यास भाग पाडले त्यामुळे अँड शिवानंद काशिनाथ मळभगे यांनी सदर शाळेस कायदेशीर नोटिस पाठवुन देण्यात आली व त्याचे प्रत मा. जिल्हा अधिकारी साहेब, लातुर तसेच मा. शिक्षण अधिकारी साहेब लातुर व मा. शिक्षण उपसंचालक साहेब, लातुर यांना देण्यात आली मात्र सदर नोटिस देवून ही कोणतेही कार्यवाही न केल्यामुळे दि. ६ /०९/२०२२ व १०/१०/२०२२ रोजी मा. शिक्षण उपसंचालक साहेब लातुर यांना तकारी अर्ज देण्यात आले मात्र सदर अर्ज देवून ही संबंधित शाळेवर कोणतेही चौकशी किंवा कार्यवाही करण्यात आले नाही त्यामुळे नाइलाजास्तव अँड शिवानंद काशिनाथ मळभगे यांनी मा. उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिटपिटीशन दाखल करण्यात आले सदर रिटपिटीशन आधारे मा. उच्च न्यायालयानी दि. ०७/०२/२०२३ रोजी संबंधित माऊन्ट लिटेरा झी स्कुल मादलापुर, उदगीर या शाळेचे दि. ३०/०४ / २०२३ पुर्वी चौकशी करून कार्यवाही करण्याचे आदेश मा. शिक्षण उपसंचालक साहेब, लातुर यांना देण्यात आलेले आहे. सदर रिटपिटिशन अँड संतोष एस. पाटील यांनी अर्जदार यांची बाजु मांडली.