शेतकरी तुपकर व अन्य शेतकऱ्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्या
लातूर (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना पीकविमा, शेतीमाल दरवाढ साठी आंदोलन करणाऱ्या रविकांत तुपकर यांच्या सह शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील विवीध भागात सद्या शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत, लातूर मध्येही पिकविम्याच्या मागणीसाठी शेतकरी क्रांती आंदोलन च्या वतीने उपोषण, रस्ता रोको झाले होते. काल शेतकरी आंदोलनादरम्यान तुपकर व अन्य शेतकरी बांधवांवर दाखल केलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत व खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी आंदोलक सचिन दाने व सहकाऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांवर विविध गंभीर गुन्हे ३५३, ३०९, १७१, १४७, १४८, १४९, ३३६, १०९, १८८, प्रॉपर्टी ड्यामेज ॲक्ट दाखल केले जात आहेत.गुन्हे दाखल करण्या एवेजी शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न सोडवावेत, पीकविमा द्यावा, शेतीमालाचे भाव वाढवावेत, मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी शेतकरी पीकविमा क्रांती आंदोलन चे नेते व मा. शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन दाने व शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. सर्व शेतकरी आता एकजूट होऊन आपल्या मागण्यांसाठी लढा देत आहेत. शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाल्यास आणखीन तीव्र आंदोलने महाराष्ट्रभर होतील असा इशारा ही देण्यात आला आहे.